Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Old Pension Scheme News ] : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करणे बाबत शालेय शिक्षण विभागांकडून दिनांक 09 ऑक्टोंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
दिनांक 01 नोव्हेंबर 2005 रोजी अंशत : अनुदानित व विना अनुदानित असलेल्या प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन ( Old Pension ) योजना लागु करणेबाबत , शिक्षण उपसंचालक हारुन आतार यांनी मा.शिक्षण संचालक ( माध्यमिक व उच्च माध्यमिक ) शि.संचालक पुणे व मा.शिक्षण संचालक ( प्राथमिक ) शिक्षण संचालक पुणे यांच्या प्रति परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
यासाठी मा.आमदार श्री. भगवान साळुंखे यांनी दि.24.04.2023 रोजी निवेदन दिले होते , तसेच दिनांक 25.09.2023 रोजी परत निवेदन देण्यात आलेले होते . तसेच सदर कार्यालयाकडील क्र.अंदाज 82 निवेदन दि.18.05.2023 रोजीच्या संदर्भाधिन पत्रानुसार पुढीलप्रमाणे परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
यांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , वरील नमुद निवेदनानुसार , आवश्यकतो कार्यवाही करणेबाबत तसेच संबंधितांना कळविण्याबाबत या कार्यालयाचे वरील नमुद केल्याप्रमाणे संदर्भाधीन पत्रानुसार यापुर्वीच कळविण्यात आलेले होते . तथापि याबाबतचा अहवाल प्रतिक्षाधीन आहे .
तरी आमदार श्री.भगवान साळुंखे यांचे दिनांक 25.09.2023 रोजीच्या निवेदनानुसार दिनांक 01 नोव्हेंबर 2005 रोजी अंशत : अनुदानित व विना अनुदानित असलेल्या प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन ( Old Pension ) योजना लागु करणेबाबत निवेदन सादर केलेले आहेत तरी याबाबत आपल्या स्तरावर आवश्यक ती कार्यवाही करुन संबंधितांना कळविण्याचे निर्देश शिक्षण उपसंचालक अंदाज व नियोजन विभाग यांनी शिक्षण संचालक ( माध्यमिक व उच्च माध्यमिक ) व शिक्षण संचालक ( प्राथमिक ) पुणे यांना दिले आहेत .
तसेच याबाबत पुनश्च पत्रव्यवहार करावा लागणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच केलेल्या कार्यवाहीबाबत व कार्यालयास अवगत करण्याचे सुचित करणयात आलेले आहेत . या संदर्भात शिक्षण उपसंचालक ,अंदाज व नियोजन यांच्या कडून दि.09.10.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर परिपत्रक खालील प्रमाणे पाहु शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.