Live Marathipepar , प्रणिता पवार [ State Employee Old Pension Scheme ] : जुनी पेन्शन योजनाच्या मागणीकरीता राज्यातील शासकीय , निमशासकीय ( जिल्हा परिषद ) कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचारी लोकशाही मार्गाने आपल्या हक्कासाठी लढा देत आहेत . आता राज्यातील कर्मचाऱ्यांकडून पेन्शन एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहेत .
पेन्शन एल्गार मेळावा : जुनी पेन्शन योजना बंद करुन सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीनंतरचे भविष्य काळोखात लोटले आहेत . खाजगीकरण – कंत्राटीकरण या धोरणांची अंमलबजावणी झाल्याने , सामान्य घरातील युवकांच्या मनातील सरकारी नोकरीच्या स्वप्नाची राखरांगोळी झाली आहे . शासनाचे हुकुमशाही धोरण इथल्या संविधानिक लोकशाहीला भगदाळ पाडत आहेत .
त्यामुळे अशा हूकूमशाही शासनाचे धोरण कायमचे उलथुन लावणे गरजेचे आहे . यासाठी मतदान जुन्या पेन्शनसाठी , मतदान – हक्काच्या नोकरींसाठी मतदान लोकशाही वाचविण्यासाठी अशा नाऱ्यांसह एल्गार करण्याकरीता राजीव गांधी सभागृह बडसा रोड ब्रम्हपुरी येथे दिनांक 22 ऑक्टोंबर 2023 , वार रविवार वेळ सकाळी 11.00 वाजता कर्मचाऱ्यांना पेन्शन एल्गार मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आव्हान महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनामार्फत करण्यात आलेले आहेत .
या महा – पेन्शन एल्गार मेळाव्यास राज्य विधानसभा विरोधी पक्ष नेते मा.विजयभाऊ वडेट्टीवार , तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा.नानाभाऊ पटोले यांची प्रमुख उपस्थित असणार आहेत . तसेच मा.सुधाकर अडवाले , नागपुर शिक्षक आमदार , अभिजित वंजारी पदवीधर आमदार नागपूर विभाग , वितेश खांडेकर राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना , मा .प्रदिप राठोड विभागीय खाजगी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना आदिंची उपसिथतीमध्ये पेन्शन एल्गार संपन्न होणार आहे .
सदर पेन्शन एल्गार मेळाव्याचे आयोजन हे सतिश डांगे ब्रम्हपुरी तालुका अध्यक्ष , मा.प्रा बालाजी दमकोंडवार तालुका उपाध्यक्ष तसेच इतर तालुका पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलेले आहेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.