लाईव्ह मराठी पेपर , संगीता पवार : देशपातळीवर राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS ) व खाजगीकरणच्या विरोधात आंदोलन सुरू आहेत . आता दिनांक 01 ऑक्टोबर 2023 रोजी दिल्ली येथे ऐतिहासिक भव्य आंदोलन होणार आहे . या आंदोलनासाठी देशभरातील कर्मचारी / नागरिक उपस्थित राहणार आहेत ..
सन 2004 नंतर शासन सेवेमध्ये रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना 1982 – 84 ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात यावी याकरिता देशपातळीवर मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांकडून आंदोलन केले जात आहेत . काही राज्य सरकारने राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करून परत जुनी पेन्शन योजना लागू केली आहे , यामध्ये राजस्थान ,छत्तीसगड, पंजाब, हिमाचल प्रदेश या राज्यांचा समावेश आहे .
त्याचबरोबर केंद्र शासनाकडून कर्मचाऱ्यांची पेन्शन बाबत मागणी लक्षात घेता , राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये बदल करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे . यानुसार मिळालेल्या माहितीनुसार कर्मचाऱ्यांना शेवटच्या पगाराच्या 45% रक्कम पेन्शन मधून देण्यात येणार आहे , परंतु हा निर्णय कर्मचाऱ्यांना कदापि मान्य होणार नाही , कारण या रकमेवर महागाई भत्ता अदा केला जाणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहेत ..
हे पण वाचा : Pay Commission : आठवा वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय , कर्मचाऱ्यांचे उजळणार भाग्य !
राष्ट्रीय पातळीवर कर्मचाऱ्यांचे हित जोपासण्यासाठी दिनांक 01 ऑक्टोबर 2023 रोजी दिल्ली येथे भव्य आंदोलन करण्यात येणार आहे . यासाठी राज्यातील लाखो कर्मचारी दिल्लीकडे रवाना होण्यासाठी रेल्वे , बस रिझर्वेशन करीत आहेत . या ऐतिहासिक भव्य आंदोलनास सहभाग होण्याकरिता महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने कर्मचाऱ्यांना आव्हान करण्यात आली आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी ,शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक , कुटुंबनिवृत्ती वेतन धारक असाल तर , व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा !

- एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ केवळ विशिष्ट पदांनाच ; इतर पदांना वेगळे नियम !
- यापुढे आता केंद्र सरकारकडून सेंद्रिय शेतीमाल करीता नवी प्रणाली लागु ; जाणून घ्या सविस्तर !
- नदीजोड प्रकल्पाचा पश्चिम महाराष्ट्रातील 03 जिल्ह्यांना तर मराठवाड्यातील 06 जिल्ह्यांना मिळणार लाभ !
- रजा प्रवास सवलत अंतर्गत कर्मचाऱ्यांना मोफत प्रवासाची सुविधा ; या सार्वजनिक वाहनातुन करता येणार मोफत प्रवास !
- आठवा वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचे वेतन 38 टक्के तर पेन्शन मध्ये 34 टक्क्यांची होईल वाढ !