Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ old pension scheme gram vikas vibhag paripatrak ] : दिनांक 01 नोव्हेंबर 2005 पुर्वी पदभरती जाहीरात / अधिसुचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक 01 नोव्हेंबर 2005 रोजी अथवा त्यानंतर रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागु करणेबाबत , राज्य शासनांच्या ग्राम विकास विभागांकडून दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आला आहे .

सदर शासन परिपत्रक राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ( सर्व ) ( नाशिक वगळून ) यांच्या प्रति सादर करण्यात आलेला आहे , सदर परिपत्रकांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , वित्त विभागाकडील दिनांक 02 फेब्रुवारी 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये दिनांक 01 नोव्हेंबर 2005 पुर्वी पदभरती जाहीरात / अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक 01 नोव्हेंबर 2005 रोजी अथवा त्यानंत रुजु ..

झालेल्या अधिकारी / कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करणेसाठी एक वेळ पर्याय देण्याचा निर्णय घेण्यासाठी या प्रकरणी किती कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे व त्यासाठी शासनावर येणारा आर्थिक भार या संदर्भातील विहित प्रपत्रात मागविण्यात आलेली होती , परंतु सदर माहिती अद्याप अप्राप्त आहे .

सदर प्रकरणी मा. उच्च न्यायालय खंडपीठ नागपुर येथे रिच याचिका क्र.982/2024 दाखल करण्यात आली आहे , त्या अनुषंगाने न्यायालयीन प्रकरणाचे गांभीर्य व कालमर्यादा लक्षात घेता , सदर माहिती विहीत प्रपत्रात दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी सायं. 6 वाजेपर्यंत ई-मेल द्वारे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *