Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra State Employee Old Pension Schme Finance Department Shasan Nirnay ] : दिनांक 01 नोव्हेंबर 2005 पुर्वी पदभरती जाहीरात / अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक 01 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर रुजु झालेल्या शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागु करणेबाबत , वित्त विभागांकडून दिनांक 02 फेब्रुवारी 2024 रोजी अधिकृत्त शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
दिनांक 01 नोव्हेंबर 2005 पुर्वी पदभरती जाहीरात / अधिसूनचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक 01 नोव्हेंबर 2005 रोजी अथवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 महाराष्ट्र नागरी सेवा ( निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण ) 1984 व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व अनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागु करण्यासाठी एक वेळ पर्याय सदर शासन निर्णयान्वये देण्यात येत आहेत .
सदर नियमांमध्ये बसणाऱ्या संबधित अधिकारी / कर्मचारी यांनी जुनी निवृत्ती वेतन त्याचबरोबर त्या अनुषंगिक नियम लागू करण्याचा सदर पर्याय हा सदर शासन निर्णय निर्गमित केल्याच्या दिनांकापासून 06 महिन्यांच्या कालाधीतमध्ये लागु करणे बंधनकारक करण्यात आलेला आहे . तसेच जे राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी हे सहा महिन्याच्या कालावधीत जुनी पेन्शन वेतन योजना लागू करण्याचा पर्याय देणार नाहीत , त्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन ( NPS ) लागू राहील , तर राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांनी प्रथम दिलेला पर्याय हाच अंतिम राहील .
जे राज्य सरकारी अधिकारी / कर्मचारी हे जुनी पेन्शन व त्या अनुषंगिक नियम लागु करणेबाबतचा पर्याय निवडतील त्याचे GPF खाते उघडण्याचे व सदर खात्यांमध्ये NPS खात्यामधील फक्त कर्मचाऱ्यांच्या हिश्याची रक्कम व्याजासह जमा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
त्याचबरोबर जे राज्य सरकारी अधिकारी / कर्मचारी जुनी पेन्शन व त्या अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय निवडतील त्यांच्या NPS मधील राज्य शासनांच्या हिश्याची रक्कम व्याजासह राज्याच्या एकत्रित निधी वळती करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . या संदर्भात राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 02.02.2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.