लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत दिनांक 01 नोव्हेंबर 2005 नंतर रुजु होणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजनाचा लाभ अनुज्ञेय करण्यात आलेला आहे , या एनपीएस धारक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करणेबाबत , सध्या राज्य शासनांकडून अभ्यास समितीचे गठण करण्यात आलेले आहेत .
सदर अभ्यास समितीचा अहवाल हा 14 जुन रोजी राज्य शासनांस सादर करण्यात येणार होता , परंतु केंद्र सरकारने देखिल एनपीएस मध्ये बदल करणेबाबत , समितीची स्थापना केली असल्याने , राज्य शासनांकडून गठित अभ्यास समितीस 31 जुलै 2023 पर्यंत पुन्हा मुतदवाढ देण्यात आलेली आहे . या निर्णयामुळे राज्य शासकीय अधिकारी /कर्मचाऱ्यांमध्ये मोठी नाराजगी दिसुन येत आहे .
सध्या भारतामध्ये पंजाब , राजस्थान , हिमाचल प्रदेश , कर्नाटक , झारखंड आदि राज्य शासनांकडून राज्य कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना ( NPS ) रद्द करुन परत जुनी पेन्शन योजना ( OLD PENSION ) चा लाभ लागु करण्याात आलेला आहे .
हे पण वाचा : राज्य कर्मचाऱ्यांची पेन्शन साठी आता आरपारची लढाई , पेन्शन शंखनाद रॅली आयोजन !
महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करणे संदर्भात दिनांक 22 जुनला राज्याच्या मुख्य सचिव यांच्या सोबत राजपत्रित अधिकारी महासंघाची बैठक आयोजित करण्यात आलेली होती , या बैठकीमध्ये जुनी पेन्शन कधी लागु होईल या संदर्भात प्रश्न उपस्थित केला असता , राज्याचे मुख्य सचिव यांनी स्पष्ट केले कि , राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन संदर्भात केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार राज्य शासनांकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल , असे सांगण्यात आले .
यावर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनाचे राज्याध्यक्ष यांच्याशी संवाद साधला असता , जुनी पेन्शन योजना आहे तशीच पुर्ववत लागु करावी , त्यामध्ये कोणताही बदल नको किंवा कोणाच्या धर्तीवर नको असा निर्णय शिंदे सरकाने निर्णय घ्यावा अन्यथा राज्य कर्मचारी परत राज्यव्यापी संपावर जातील , असे स्पष्टीकरण देण्यात आले .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , तसेच इतर पात्र , सेवानिवृत्त पेन्शनधारक / निवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !
- SSC / HSC महाराष्ट्र राज्य फेब्रु/ मार्च बोर्ड परीक्षा 2024 वेळापत्रक प्रसिद्ध ; पाहा / डाऊनलोड करा PDF
- राज्यात दि.27 ते 30 नोव्हेंबर पर्यंत राज्यातील या 09 जिल्ह्यात पावसाची शक्यता ; तर दि 01 ते 04 डिसेंबर काळात अवकाळी पावसाची शक्यता !
- एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार निवडुन येणाऱ्या संभाव्य आमदारांची नावे ; या 10 अपक्ष आमदारांचा देखिल समावेश .
- शिक्षकांची वाढीव पदे समायोजन करणेबाबत , महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित !
- इ.10 वी / 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक जाहीर ; जाणून घ्या तोंडी व लेखी परीक्षा वेळापत्रक !