Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ OPS Mised Call Mohim ] : जुनी पेन्शन योजनासाठी आता सरकारी कर्मचारी अधिकच आक्रमक झाले असताना , अशांमध्ये मोदी सरकारकडून एन पी एस मध्येच बदल करण्यात येत आहेत तर राष्ट्रीय काँग्रेस पक्षांकडून सत्ता आल्यानंतर जुनी पेन्शन योजनांप्रमाणे लाभ देण्याचे पुर्ण आश्वासन देण्यात देत आहेत .
यापुर्वी राष्ट्रीय काँग्रेसची सत्ता आल्यानंतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करण्यात आली आहे , यांमध्ये राजस्थान राज्य सरकार , हिमाचल राज्य सरकार तसेच कर्नाटक , छत्तीसगढ राज्य सरकारने जुनी पेन्शन योजना लागु करण्यात आली आहे , कारण राष्ट्रीय काँग्रेस पक्षांने तेथील कर्मचाऱ्यांना सत्ता स्थापनेनंतर जुनी पेन्शनचा लाभ लागु करण्याचे आश्वासन दिले होते .
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रीय काँग्रेस पक्षांकडून आगामी लोकसभा व विधानसभेमध्ये काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता स्थापन झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करण्यात येईल . यासाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षांकडून विशेष मिस्ड कॉल मोहिम राबविण्यात येत आहेत . यासाठी कर्मचाऱ्यांना 8587070707 या नंबरवर मिस्ड कॉल देवून आपला पाठिंबा असल्याचे समर्थन देण्याचे आव्हान करण्यात येत आहेत आहेत .
सरकारी कर्मचाऱ्यांचा निवडणुकांमध्ये विशेष महत्व असते , कारण सरकारी कर्मचाऱ्यांना समाजांमध्ये विशेष प्रतिष्ठा असते , ज्यांमुळे सरकारी कर्मचाऱ्यांकडे मत परिवर्तन करण्याची ताकत आहे . यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करण्याचे आश्वासन राष्ट्रीय काँग्रेस पक्षांकडून देण्यात येत आहेत .
सध्या महाराष्ट्र राज्यांमध्ये राज्यातील कर्मचारी जुनी पेन्शन योजनांच्या मागणीसाठी अधिकच आक्रमक झालेले आहेत , राज्य कर्मचाऱ्यांकडून वोट फॉर पेन्शन असा नारा देण्यात येत आहेत , यामुळे जो पक्ष जुनी पेन्शन लागु करेल त्याच पक्षाला राज्यातील कर्मचारी मत देणार आहेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.