Spread the love

सध्या देशांमध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरु आहेत , नुकतेच कर्नाटक राज्याच्या विधानसभा निवडणुका संपन्न झाल्या आहेत . या निवडणुकींमध्ये राष्ट्रीय काँग्रेसने जुनी पेन्शन या मुद्द्यावर मोठ्या संख्येने विजय मिळवला आहे . कर्नाटकचे नव्हे तर हिमाचल प्रदेश राज्यातील विधानसभा निवडणुका देखिल राष्ट्रीय काँग्रेसने राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करण्याच्या आश्वासनावर विजय मिळवला आहे .एकंदरीत राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनच्या मुद्द्यावर सत्तापालट होताना दिसून येत आहेत .

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची सत्ता आल्यास जुनी पेन्शन योजना पुर्वीलक्षी प्रभावाने लागु करु असे आश्वासन देत आहेत , प्रत्यक्षात लागु देखिल करत असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांचा मोठा पाठिंबा राष्ट्रीय काँग्रेसला मिळत असल्याचे दिसून येत आहेत .राष्ट्रीय काँग्रेसने अशीच घोषणा हरीयाणा विधानसभेच्या अनुषंगाने अनेक दिलासादायक घोषणा केलेल्या आहेत . नेमक्या कोणकोणत्या घोषणा काँग्रेस पक्षाने केल्या आहेत , तु पुढीलप्रमाणे सविस्तर पाहुयात ..

हिमाचल राज्यांमध्ये बहुमताने काँग्रेसची सत्ता स्थापन झाल्यास , काँग्रेस सरकारकडून हरीयाणा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना इतर राज्यांप्रमाणे जुनी पेन्शन योजनाचा लाभ पुर्वलक्षी प्रभावाने लागु करण्यात येईल .त्याचबरोबर 300 युनिट पर्यंतचे विजबिल पुर्णत: माफ करण्यात येईल . त्याचबरोबर अनुदानासह 500/- रुपयांमध्ये गॅस सिलेंडर देण्यात येईल .

हे पण वाचा : शाळांच्या वेळापत्रकामध्ये मोठा बदल सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत भरणार शाळा !

त्याचबरोबर वयोवृद्ध नागरीकांना प्रतिमहा 6000/- रुपये वृद्धापकाळ निवृत्तीवेतन देण्यात येईल .त्याचबरोबर हरीयाणा राज्य शासन सेवेत रिक्त पदांवर तब्बल 2 लाख जागेवर महाभरती प्रक्रिया राबविण्यात येईल , ज्यामुळे राज्यातील बेरोजगार तरुणांना रोजगाराची उत्तम संधी उपलब्ध होईल . असे अनेक आश्वासनांची पुर्तता काँग्रेसची सत्ता आल्यास पुर्ण करण्यात येईल असे , काँग्रेसचे खासदार दिपेंद्र सिंह हुड्डा यांनी ट्टिट करुन सांगितले आहे .

शासकीय कर्मचाऱ्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *