Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Old Pension Scheme , Group Leave letter ] : जुनी पेन्शनच्या मागणीसाठी दिनांक 14 डिसेंबर रोजी अधिकाऱ्यांचा राज्यव्यापी सामुहिक रजा आंदोलनाचा निर्धार करण्यात आला आहे , या संदर्भात महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाकडून दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
राज्य शासनातील सर्वांना जुनी पेन्शन लागु करणे संदर्भात शासनाला सादर झालेल्या अहवालास मंजूरी व अंमलबजावणी करण्यास होत असलेल्या शासन दिरंगाईमुळे , सर्व अधिकाऱ्यांमध्ये असंतोषाची भावना पसरली असून , त्या अनुषंगाने दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी सामुहिक रजा आंदोलन करण्याचा निर्धार अधिकारी महासंघाच्या दि.12.12.2023 रोजी झालेल्या राज्य कार्यकारीणी बैठकीत करण्यात आला आहे .
जूनी पेन्शन लागू करणे तसेच इतर महत्वाच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी सामुहिक रजा आंदोलन करण्याबाबत अधिकारी महासंघाच्या दिनांक 31 ऑक्टोंबर 2023 रोजी अधिकारी महासंघाच्या बैठका झालेल्या आहेत . त्याच अनुषंगाने दिनांक 22 नोव्हेंबर 2023 रोजी जुनी पेन्शन संदर्भातील समितीचा अहवाल देखिल शासनास सादर झाला आहे . परंतु राज्य शासनांकडून अद्याप सदर अहवाल मंजूरी तसेच त्याच्या अंमलबजावणीबाबत अवाजवी विलंब होत आहे . त्यामुळेच मा.मुख्यमंत्री महोदयांनी दिनांक 20 मार्च 2022 रोजी दिलेल्या आश्वासनानुसार , जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे आर्थिक लाभ , सामाजिक आणि आर्थिक स्थैर्यासह नविन पेन्शनधारकांना निवृत्तीवेतन देण्याच्या तत्वाचे तंतोतंत पालन होईल की नाही याबद्दल सर्व अधिकाऱ्यांमध्ये साशंकता आहे .
शासन – प्रशासन प्रमुखांसमवेतच्या बैठकांमध्ये , सर्व राज्य शासकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी तसेच जिव्हाळ्याच्या इतर मागण्यांबाबत , देखिल अधिकारी महासंघाने आग्रही भूमिका मांडली होती . तसेच शासनाने फक्त सकारात्मकता दर्शवत अद्याप कोणतेही शासन निर्णय निर्गमित केलेले नाहीत . त्यामुळेच राज्यभरातील सर्व अधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली असून , दिनांक 12 डिसेंबर रोजी झालेल्या अधिकारी महासंघाच्या राज्य कार्यकारणी बैठकीमध्ये दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी राज्यव्यापी सामुहिक रजा आंदोलन करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आलेला आहे .
सदर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महासंघाचे सर्व पदाधिकारी , संलग्न संघटनांचे पदाधिकारी , जिल्हा समन्वय समित्यांचे पदाधिकारी यांनी संबंधित विभागांतील अधिकाऱ्यांना एक दिवसााच्या सामुहिक रजेबाबत (नैमित्तिक / अर्जित / असाधारण ) मार्गदर्शन करुन , आंदोलनात सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदविण्याचा व आंदोलन यशस्वी करण्याचे महासंघाच्या वतीने आवाहन करण्यात आलेले आहेत .त्याचबरोबर राज्यातील सरकारी , निमसकारी व इतर पात्र कर्मचारी दिनांक 14 डिसेंबर पासुन जुनी पेन्शनच्या मागणीकरीता बेमुदत संप करणार आहेत .
या संदर्भात महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाकडून दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर प्रसिद्धीपत्रक पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.