Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ old pension demand amaran uposhan ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागु करण्यात यावी , या प्रमुख मागणीकरीता दिनांक 02 ऑक्टोंबर 2024 पासुन पेन्शन फायटर / शिलेदार यांच्याकडून आमरण उपोषण करण्यात येणार आहेत .
राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना / केंद्र सरकारची एकीकृत पेन्शन योजना यापैकी एक पेन्शन योजना निवडण्याचा पर्याय वित्त विभागाच्या दिनांक 20.09.2024 रोजीच्या निर्णयानुसार देण्यात आलेला आहे , सदर पेन्शन योजनांमध्ये कर्मचाऱ्यांना शेवटच्या मुळ वेतनांच्या 50 टक्के रक्कम पेन्शन म्हणून अदा केली जाणार आहे . परंतु सदर पेन्शन योजनांमध्ये जुनी पेन्शन प्रमाणे काही तरतुदी नमुद नाहीत , तसचे कर्मचाऱ्यांचे योगदान कायम ठेवण्यात आलेले आहेत .
यामुळेच सदर सुधारित पेन्शन योजनांचा राज्यातील कर्मचाऱ्यांकडून विरोध होत आहेत . याकरीता महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनांच्या वतीने दिनांक 02 ऑक्टोंबर 2024 पासुन आमरण उपोषण करण्यात येणार आहेत . सदरचे आमरण उपोषण हे संघटनेचे राज्याध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहेत .याशिवाय आंदोलन प्रमुख नदीम पटेल , राज्य सचिव गोविंद उगले , राज्य संपर्क प्रमुख रामदास वाघ , राज्य सहकार्याध्यक्ष राजेंद्र ठोकळ ..
तसेच आरोग्य विभाग राज्य प्रुख संजय सोनार कळवाडीकर , तसेच राज्य सह कोषाध्यक्ष श्रीनाथराव पाटील , तसेच पेन्शन शिल्लेदार प्रविण बहादे आदी पदाधिकारी सदर आमरण उपोषणांस उपस्थिती लावणार आहेत . याकरीता कर्मचाऱ्यांना उपोषणांमध्ये सहभागी होण्यासाठी आव्हान करण्यात येत आहेत .
राज्यातील कर्मचाऱ्यांना इतर कोणत्याही प्रकारची पेन्शन योजना लागु न करता , जुनी पेन्शन योजना जशाच्या तसी लागु करण्याची प्रमुख मागणी आहे . सदर जुनी पेन्शन योजनांमध्येच कर्मचाऱ्यांचे हित आहे , असे नमुद करण्यात आले आहेत . तर सदर आमरण उपोषण हे दि.02 ऑक्टोंबर 2024 पासुन सेवाग्राम वर्धा येथे सुरु होणार आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.