Spread the love

Live Marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ State Employee OPS Ahaval ] : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे पेन्शन लाभ लागु करणेबाबत सेवानिवृत सनदी अधिकाऱ्यांच्या त्रिस्तरीय सदस्यांची समिती गठित करण्यात आली होती . सदर समितीने काल दिनांक 21 नोव्हेंबर 2023 रोजी प्रदिर्घ कालावधीनंतर आपला अहवाल राज्य शासनांस सादर केला आहे .

जुनी पेन्शन प्रमाणे राज्यातील कर्मचाऱ्यांना आर्थिक व सामाजिक सुरक्षा प्रदान करणेबाबत , सेवानिवृत्त सनदी अधिकारी मा.सुबोधकुमार यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीने आपला अहवाल काल दिनांक 21 नोव्हेंबर 2023 रोजी राज्य शासनांचे वित्तमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्याकडे सादर केला आहे .सदर समिती ही राज्य शासनांने दिनांक 14.03.2023 रोजी गठीत करण्यात आली होती , सदर समितीला तीन महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले होते पंरतु मुदत संपल्यानंतर दोनवेळा पुन्हा मुदतवाढ देण्यात आलेली होती .

14 डिसेंबर पर्यंत निर्णय होणार : सदर अहवालावर लवकरात लवकर निर्णय होवून दिनांक 14 डिसेंबर 2023 पर्यंत निर्णय घेण्यात यावा अन्यथा राज्यातील तब्बल 17 लाख कर्मचारी पुन्हा संपावर जाणार असल्याचे कर्मचारी संघटनांकडून राज्य शासनांस नोटीस देण्यात आली आहे .राज्य शासनांकडून केवळ आश्वासने देत असल्याने , कर्मचारी संघटनांकडून मुदतीमध्ये निर्णय न घेतल्यास पुन्हा एकदा बेमुदत संपावर ठाम निश्चय करण्यात येत आहे .

अहवालांमधील तरतुदी : सदर अहवाल अद्याप सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यात आलेला नाही , परंतु मिळालेल्या माहितीनुसार यांमध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन साठी पर्यायी पेन्शन योजना सुचविण्यात आलेल्या आहेत . यांमध्ये आंध्र प्रदेश राज्य सरकारची गॅरंटेड पेन्शन प्रणाली , तसेच केंद्र सरकारने सुचित केलेली वयोमानानुसार पेन्शन प्रणाली तसेच राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये निवृत्तीनंतर पेन्शनची हमी अशा प्रकारचे पेन्शन पर्याय असतील .

पंरतु राज्यातील कर्मचारी हे जुनी पेन्शन वर ठाम आहेत , कारण काँग्रेस पक्षाची सत्ता असणाऱ्या राज्य सरकारने जुनी पेन्शन प्रणाली परत लागु केली तर राज्यातील कर्मचाऱ्यांना का लागु होत नाही , असा सवाल राज्यातील कर्मचाऱ्यांकडून विचारला जात आहे . जर सदर अहवालांमध्ये कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे पेन्शन लाभ लागु न झाल्यास राज्यातील कर्मचाऱ्यांची पुन्हा एकदा बेमुद संप व आगामी निवडणुकांमध्ये जो पेक्ष पेन्शन देईल त्यालाच मत देतिल .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *