Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Old Pension Scheme Today cm Office Publish IMP paripatrak ] : आज दिनांक दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी राज्यातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांनी नागपुर येथे उपस्थित राहून जुनी पेन्शनच्या मागणीकरीता भव्य मोर्चा काढला असून , या मोर्चाची दखल घेत राज्याचे मुख्यंमत्री सचिवालय मार्फत अत्यंत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत .
सदर परिपत्रकांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , माननिय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 5.00 वाजता मंत्रीमंडळ विधान भवन प्रांगण नागपुर येथे जुन्या पेन्शन योजनेबाबत राज्य शासकीय मान्यताप्राप्त अधिकारी व कर्मचारी संघटनेसमवेत बैठक आयोजित करण्यात आलेली आहे .
सदर बैठकीस राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री , मुख्य सचिव तसेच राज्याचे सर्व अवर मुख्य सचिव तसेच प्रधान सचिव – नियोजन व अन्य आवश्यक अधिकारी यांना निमंत्रित करण्यात आलेले आहेत . सदर बैठकीसाठी राज्यातील विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी / प्रतिनिधी यांना आमंत्रित करण्यात आलेले आहेत , सदर संघटना/ पदधिकारी यांचे नावे पुढीलप्रमाणे आहेत .
सदर बैठकीसाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित महासंघाचे पदाधिकारी श्री.कुलथे व प्रतिनिधी तसेच राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे पदाधिकारी श्री.विश्वास काटकर व प्रतिनिधी तसेच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संघाचे पदाधिकारी श्री.संभाजीराव थोरात व प्रतिनिधी यांना निमंत्रित करण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिलेले आहेत .
या संदर्भात मुख्यमंत्री सचिवालय मार्फत दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर पत्र पुढीलप्रमाण पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.