राज्य कर्मचाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत 100℅ जुनी पेन्शन लागू करण्याचे आश्वासन !

Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील शिक्षक – कर्मचाऱ्यांना तसेच अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वित्त विभागांशी चर्चा करून जुनी पेन्शन लाभ लागू करू , परंतु कोणत्याही परिस्थितीत राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याचे मोठे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत .

राज्यातील अनुदानित शाळेतील 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत रुजू झालेले शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी दि.03 मे 2023 पासून , जुनी पेन्शन या मागणी करिता मुंबई येथील आझाद मैदान येथे बेमुद संप करत आहेत .या कर्मचाऱ्यांना राज्याचे मुख्यमंत्री यांनी संबोधित करताना सांगितले की , अभ्यास समितीचे अहवाल जाहीर झाल्यानंतर 2005 पासून राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे आर्थिक व सामाजिक सुरक्षा प्रदान करेल अशी पेन्शन योजना लागू करण्यात येईल .

राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर , NPS धारक कर्मचाऱ्यांना कुटूंब निवृत्तीवेतन तसेच रुग्णता निवृत्तीवेतन योजना दि.31 मार्च 2023 रोजीचा शासन निर्णय नुसार लागू करण्यात आलेली आहे .परंतु सदरचा लाभ अनुदानित शाळेतील शिक्षक – कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आला नसल्याने , अनुदानित शाळेतील कर्मचारी सध्या बेमुद संपावर आहेत .

हे पण वाचा : दि.16 मे 2023 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत कर्मचारी पगार वाढीसह घेण्यात आले इतर महत्वपूर्ण निर्णय !

राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे आर्थिक व सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याचे लेखी आश्वासन राज्य मुख्यमंत्री यांनी दिल्याने पुढील महिन्यात याबाबत सकारात्मक निर्ण होण्याची दाट शक्यता आहे .शिवाय हिमाचल प्रदेश , कर्नाटक राज्यांमध्ये जुनी पेन्शन मुद्यावर भारतीय जनता पक्षाला हार पत्कारावी लागल्याने , राज्य सरकार पेन्शन लागू करण्याच्या तयारीत दिसत आहे .

शासकीय कर्मचारी ,नोकर पदभरती , तसेच चालू घडामोडीच्या अपडेट साठी whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा !

Leave a Comment