Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ oil rate increase update ] : सोयाबीन तेलाच्या दरवाढीमध्ये 30 टक्के पर्यंतची वाढ झाली आहे , सदरचे परिणाम हे सोयाबीन दरवाढीमुळे झाले आहेत . याबाबतची सविस्तर अपडेट पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
मागील काही महिन्यांपासुन स्थिर असलेल्या तेलाच्या किंमतीमध्ये वाढ झालेली आहे . केंद्र सरकारने तेलावर 20 टक्के आयात शुल्क आकारल्याने , तेलाच्या किंमतीमध्ये 30 टक्क्यांची वाढ झाली आहे . कारण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाची आवक कमी होत आहे . यामुळेच तेलाच्या किंमती वाढल्या आहेत .
दिवाळीच्या कालावधीत तेलाच्या किंमतीत वाढ झालेली होती , परत एकदा तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे . एपीएमसी बाजारांमध्ये प्रतिमहा 7 ते 8 टन तेलाची आवक हेाते , तर मागणी वाढत असल्याने , पुरवठा कमी पडत असल्याने , तेलाच्या दरामंध्ये तब्बल 30 टक्के पर्यंत वाढ होत आहे .
सध्याचे तेलाचे दर पाहिले असता , सुर्यफुल तेल यापुर्वी 120/- रुपये किलो होते , तर आता 140/- रुपये प्रतिकिलो झाले आहेत . तर पाम तेलाचे आधीचे दर 100/- रुपये प्रतिकिलो होते , तर आता सदर पामतेलाचे दर हे 135-140/- रुपये प्रति किलो झाले आहेत .
तर सोयाबीन तेलाची यापुर्वीचे दर हे 115-120/- रुपये प्रतिकिलो होते , तर आता हे दर 130-135/- रुपये प्रतिकिलो इतके झाले आहेत .