Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ October to December havaman andaj detail ] : सद्यस्थितीमध्ये पावसाने काहीसा विराम दिला आहे , मान्सून परतीचा पाऊस यंदा मागील महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात पडला आहे . तर माहे ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये पावसाचा अंदाज नेमका कसा असणार ? या संदर्भात हवामान खात्याची माहिती पुढील प्रमाणे जाणून घेवूयात .
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार , माहे ऑक्टोबर महिन्यापासून नैऋत्य मान्सूनचा काळ संपणार आहे . तर ईशान्य मान्सून पर्जन्यास सुरुवात होणार आहे . सदर ईशान्य मान्सूनचा काळ ऑक्टोबर ते डिसेंबर असा असतो , या कालावधीमध्ये देशातील दक्षिणेकडील राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो .
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार , यंदाच्या वर्षी ईशान्य मान्सून पर्जन्यामुळे दक्षिण भारतातील राज्यामध्ये सरासरीपेक्षा 112 टक्के पेक्षा अधिक पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे . तर सदर ईशान्य मान्सून पासून महाराष्ट्र राज्यात मराठवाडा विभाग वगळता विदर्भ , कोकण व मध्य महाराष्ट्र या भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे .
सद्यस्थितीमध्ये ऑक्टोबर हिट मुळे वातावरण अधिक उष्ण होत चालले आहे . यामुळे देशातील दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश , तामिळनाडू ,केरळ , कर्नाटक या राज्यामध्ये ईशान्य मोसमी वारे अधिक सक्रिय होताना दिसून येत आहेत . बंगालच्या उपसागरावरून बाष्प तयार होऊन , दक्षिण भारतामध्ये ईशान्य मोसमी वारे पासून पर्जन्यमान होत असतो . यामुळे सदर ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये ईशान्य मौसमी वाऱ्यापासून , दक्षिणेकडील राज्यामध्ये यंदाच्या वर्षी सरासरीपेक्षा 112 टक्के पेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे .