Spread the love

Live Marathipepar संगिता पवार , प्रतिनिधी [ October month Payment Shasan Patrak Dated 10.10.2023 ] : माहे ऑक्टोंबर महिन्यांचे नियमित वेतन / पगार बाबत अधिक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक ( माध्यमिक ) नांदेड यांच्याकडून दिनांक 10 ऑक्टोंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .

शासन निर्णय 06 फेब्रुवारी 2023 नुसार नविन 20% , व वाढीव 20% , ( 20% , वरुन 40 % व 40 % वरुन 60% ) अनुदान पात्र झालेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे / वर्गतुकड्या / शाखेवरील अनुदान वितरण आदेश व 2022-23 ची संच मान्यता सादर करणेबाबत नमुद करण्यात आलेले आहेत .

सदर स्पष्टीकरण देताना नमुद करण्यात आलेले आहेत कि , शाळेतील / उमावितील शा.नि.दि.06.02.2023 नुसार नविन नविन 20% , व वाढीव 20% , ( 20% , वरुन 40 % व 40 % वरुन 60% ) अनुदान पात्र झालेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे / वर्गतुकड्या / शाखेवरील अनुदान वितरण आदेश व 2022-23 ची संच मान्यता सादर करुन शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सदर विवरणपत्रात वेतन अनुदाची माहिती भरुन सदर अनुदान टप्याच्या शासन आदेशाची व 2022-23 च्या संचमान्यतेच्या प्रतिसह दिनांक 16 ऑक्टोंबर 2023 पर्यंत सदर कार्यालयास सादर कराण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

सदरची माहीती ही सदर वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक विभाग यांच्याकडे प्राप्ता न झाल्यास सदर आस्थापनातील कर्मचाऱ्यांचे माहे ऑक्टोंबर 2023 चे नियमित वेतन पारीत केले जाणार नसल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत .

या संदर्भात वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकांकडून निर्गमित करण्यात आलेला पत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *