Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ October month payment update ] : राज्यातील कर्मचाऱ्यांचे वेतन / निवृत्तीवेतन हे ऑक्टोंबर महिन्यापुर्वीच अदा केले जाणार असल्याची मोठी अपडेट समोर येत आहे . कारण या महीन्यात दिवाळी सणाची सुरुवात ही 26 ऑक्टोंबर पासुन होते आहे .
महाराष्ट्र राज्य सरकारकडून विशेष सणानिमित्त वेतन / निवृत्तीवेतन हे वेळेपुर्वीच अदा केले जाते . ज्यामुळे कर्मचाऱ्यांना सणांच्या खरेदी करीता पैशांची अडचण भासणार नाही . मागील दिवाळी सणानिमित्त तसेच ईद सणानिमित्त राज्य कर्मचाऱ्यांचे वेतन / निवृत्तीवेतन हे वेळेपुर्वीच अदा करण्यात आले होते .
यानुसार यंदाच्या दिवाळी सणाच्या पुर्वीच म्हणजेच 25 ऑक्टोंबर पर्यंत राज्य कर्मचाऱ्यांचे वेतन / निवृत्तीवेतन अदा करण्यात येणार आहे . सध्या गोवा राज्य सरकारने याबाबत निर्णय घेतला आहे , यामुळे गावा राज्यातील कर्मचाऱ्यांचे वेतन / निवृत्तीवेतन हे 25 ऑक्टोंबर पुर्वीच अदा केले जाणार आहेत .
यानुसार महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील अधिकारी / कर्मचाऱ्यांना दिवाळी सण अग्रिमाच्या रक्कमेसह माहे ऑक्टोंबर महिन्याचे वेतन हे 25 ऑक्टोंबर पुर्वीच अदा केले जाणार आहेत . याबाबत वेतन पथकांकडून वेळेवर कार्यवाही केली जाणार आहे .
यांमध्ये निवृत्तीवेतन धारकांचे निवृत्तीवेतनांची रक्कम देखिल 25 ऑक्टोबर पर्यंत अदा केली जाणार आहे . यामुळे राज्य कर्मचारी / निवृत्तीवेतनधारकांना दिवाळी सणापुर्वीच वेतन /पेन्शनचा लाभ मिळणार आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.