Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ October month payment & divali festival advance update ] : कर्मचाऱ्यांचे माहे ऑक्टोंबरचे वेतन व दिवाळी सण अग्रिमची रक्कम अदा करणेबाबत , कोषागार कार्यालय वरिष्ठ कोषागार अधिकारी , छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्फत प्रेसनोट जाहीर करण्यात आलेली आहे .
सदर प्रेसनोट नुसार , दि.22.10.2024 रोजीचे मा.संचालक लेखा व कोषागारे , मुंबई यांचे VC चे अनुषंगाने प्राप्त निर्देशानुसार सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना सुचित करण्यात आले आहेत कि , दिनांक 23 ऑक्टोंबर 2024 ते दि.29 ऑक्टोंबर 2024 रोजीचे सर्वांनी ..
आपले वेतन देयके व सण अग्रिमाची देयके कोषागारात सादर करण्याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . म्हणजे वेतन वेळेवर करणे सोयीचे होणार आहे . तसेच दिनांक 26 ऑक्टोंबर 2024 ते दिनांक 29 ऑक्टोंबर 2024 या कालावधी दरम्यान कोषागाराची संगणकीय प्रणाली बंद राहणार आहे .
याकरीता नमुद दिनांक दरम्यान कोणतेही देयके कोषागारात स्विकारले जाणार नसल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत , त्यामुळे वेतन देयकास विलंब झाल्यास , त्याची सर्वस्वी जबाबदारी ही आहरण व संवितरण अधिकारी यांची राहणार असल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत .
याबाबत उपसंचालक तथा वरिष्ठ कोषागार अधिकारी छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्फत निर्गमित करण्यात आलेले प्रेसनोट पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.