Spread the love

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ October heat , rain Update ] : हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार , राज्यात ऑक्टोबर हिटमुळे उष्णतेची तीव्रता अधिकच वाढली आहे . यामुळे राज्यात उखाडा अधिक असणारा आहे . ज्यामुळे राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होणार असल्याचे , संकेत देण्यात आले आहेत .

ऑक्टोबर हिटमुळे राज्यात दिनांक 6 ऑक्टोबरपासून पावसाला पुन्हा एकदा सुरुवात होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ञ पंजाबरावांनी भाकीत केली आहे . दिनांक 5 ऑक्टोबर पर्यंत राज्यातील तापमान वाढत जाणार असून , या काळामध्ये कमाल तापमानाची नोंद होण्याची शक्यता आहे . परंतु 6 ऑक्टोबर पासून राज्यामध्ये पाऊस सक्रिय होणार असल्याचा , अंदाज व्यक्त करण्यात आला आहे .

दिनांक 6 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर दरम्यान राज्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे . तर 10 ऑक्टोबर नंतर पावसाचा जोर कमी होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे . तर दिनांक 10 ऑक्टोबर पासून ते 22 ऑक्टोबर पर्यंत राज्यामध्ये कोणत्याही ठिकाणी पाऊस पडणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे .

परंतु दिनांक 23 ऑक्टोबर पासून राज्यामध्ये पुन्हा पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे .  23 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर दरम्यान राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे .

तर दिनांक पाच नोव्हेंबर पासून राज्यामध्ये थंडी पडणार असल्याचे , संकेत हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी व्यक्त केले आहे . यामुळे शेतकऱ्यांनी शेतामधील पिकांची काढणीचे कामकाज लवकरात लवकर करून घेण्याचे सुचित करण्यात आली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *