Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Government Employee NPS Pension System Rules Change ] : राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमध्ये सरकारने मोठा बदल करण्यात आलेला असून , सदर सुधारित बदल हा दिनांक 01 फेब्रुवारी 2024 पासून लागु करण्यात येणार आहेत . यामुळे NPS धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे .
PFRDA ने जारी केलेल्या सुधारित नियमानुसार , दिनांक 01 फेब्रुवारी 2024 पासून आता कोणताही NPS सदस्य हा राष्ट्रीय पेन्शन योजना खात्यामधून 25 टक्यापर्यंतच रक्कम काढू शकता , त्यापेक्षा अधिक रक्कम काढू शकत नाही . एनपीएस सदस्य हा आपल्या एकुण गुंतवणुकीच्या कालावधीत केवळ तीन वेळा आंशिक रक्कम काढू शकतात , पैसे काढण्यासाठी किमान तीन वर्षे सलग गुंतवणुक केली पाहीजे .
अर्थात तीन वर्षांच्या गुंतवणुकीनंतर एनपीएस खात्यामधील जमा रक्कमेपैकी 25 टक्के रक्कम कधीही काढता येईल .सदरची रक्कम ही आपल्या मुलांच्या शिक्षण , लग्न त्याचबरोबर वैद्यकीय खर्च करणेकामी काढता येईल .तसेच जर सदस्यांना मुलांच्या उच्च शिक्षण कामी खर्च करायचे असल्यास सदरची रक्कम काढता येईल .तसेच आणखीण काही कारणे आहेत , ज्यासाठी एनपीएस ची 25 टक्के रक्कम काढता येईल .
यांमध्ये मुलांच्या लग्न कार्यासाठी तसेच गृहखरेदी , गृहकर्जाची परतफेड तसेच गंभीर आजार , उपचार आणि इतर वैद्यकीय खर्च कामी काढता येईल . तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये 25 टक्के रक्कम काढता येईल , तसेच कोणत्याही प्रकारच्या व्यवसाय अथवा स्टार्टअप सुरु करणे कामी सदरची काढलेली रक्कम वापरली जावू शकते .
NPS मधील रक्कम काढण्याच्या काही अटी / शर्ती : एनपीएस प्रणालीमधील जमा रक्कम काढण्यासाठी एनपीएस खाते उघडल्यापासून तीन वर्षे सदस्य असणे आवश्यक आहे , तसेच सदर खात्यामधून 25 टक्यांहून अधिकच रक्कम अंशत : काढता येणार नाही . त्याचबरोबर एनपीएस खातेदार त्यांच्या खात्यांमधून कमाल 03 वेळा आंशिक रक्कम काढू शकतील .
तर वयाच्या 60 वर्षे संपल्यानंतर एनपीएस धारक हा आपल्या जमा रक्कमेच्या 60 टक्के रक्कम काढू शकतो . त्याचबरोबर कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीनंतर सदर एनपीएस खात्यांमध्ये जर 5 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी निधी जमा असेल अशा वेळी सदर सदस्यांस संपुर्ण रक्कम काढण्याची परवानगी मिळेल .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.