लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार प्रतिनिधी : केंद्र शासनाच्या धर्तीवर सन 2004 नंतर पश्चिम बंगाल हे राज्य सरकार सोडून राज्यातील सर्वच राज्यांनी राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना रद्द करुन राष्ट्रीय पेन्शन योजना ( NPS ) योजना लागु करण्यात आलेली आहे . परंतु या योजनांमध्ये कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे कोणत्याही प्रकारचे लाभ अनुज्ञेय होत नाही , शिवाय अत्यल्प प्रमाणात पेन्शन मिळत आहे .
यामुळे सध्या भारतांमध्ये NPS ,खाजगीकरण भारत छोडो यात्रा कर्मचाऱ्यांकडून काढण्यात येत आहे . ही यात्रा दि.01 जुन 2023 पासून बिहार मधील चंपारण येथे सुरुवात होणार आहे . बिहारमधील चंपारण्य पासून सुरुवात झालेली यात्रा उत्तर प्रदेशमधील वाराणसी , प्रयागराज पासुन प्रतापगढ ,रायबरेली असा प्रवास नियोजित आहे .या यात्रेमध्ये बिहार , उत्तर प्रदेशचे तसेच देशांमधील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतले आहेत .
ही यात्रा सरकारच्या राष्ट्रीय पेन्शन योजना व खाजगीकरण धोरणाच्या विरुद्ध आहे , सरकारने राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करावी , व परत जुनी पेन्शन योजना लागु करण्यात यावी तसेच खाजगीकरण धोरण रद्द करावे याकरीता NPS व खाजगीकरण भारत छोडो यात्रा कर्मचारी व विद्यार्थींकडून काढण्यात येत आहे .या यात्रेस नागरिकांचा देखिल तेवढाच सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहेत .
हे पण वाचा : राज्य कर्मचाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने दिला मोठा दिलासादायक निर्णय !
या पेन्शन यात्रेमध्ये ऑल इंडिया लोको पायलट , रेल्वे कर्मचारी युनियन संघटना तसेच बिहार राज्य सरकारी कर्मचारी संघटना व उत्तर प्रदेश कर्मचारी युनियनने सक्रिय सहभाग नोंदवला आहे .जुनी पेन्शनच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांची ही सर्वात मोठी पेन्शन यात्रा ठरत आहे . ही पेन्शन यात्रा दि.10 जुन 2023 पर्यंत चालणार असल्याची माहीती सुत्रानुसार समजली आहे .
आपण जर शासकीय , निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पेन्शनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !