Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ NPS Pranali Stop , Old Pension Scheme GPF Account Open New Shasan Nirnay ] : जुनी सेवानिवृत्ती वेतन योजना , भविष्य निर्वाह निधी योजना आणि मृत्यू नि सेवानिवृत्ती उपदान योजना लागू केल्याने राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीचे सभासदत्व संपुष्टात आणून त्यातील रक्कमा भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये जमा करण्याची कार्यपद्धती विहीत करणेबाबत , सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 05 फेब्रुवारी 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
केंद्र शासनाच्या कार्मिक , लोकतक्रारी तसेच सेवानिवृत्ती वेतन मंत्रालयाच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाचे कार्यालयीन ज्ञापनानुसार भारतीय प्रशासन सेवेतील ज्या अधिकाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आलेले आहे . अशा अधिकाऱ्याच्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीच्या प्रान खात्यातील संचित रक्कमेपैकी केवळ अधिकाऱ्यांच्या स्वत : चे अंशदान व त्यावरील लाभाची रक्कम त्याचे भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करणे व नियोक्त्याचे अंशदान व त्यावरील लाभची रक्कम त्याचे GPF खात्यात जमा करणे व नियोक्त्याचे अंशदान व त्यावरील लाभाची रक्कम शासनाचे खाती जमा करण्यासाठी खालील प्रमोण कार्यपद्धती विहीत करण्यात येत आहेत .
यांमध्ये दिनांक 01.01.2004 रोजी व त्यनंतर भारतीय प्रशासन सेवा मध्ये रुजू झालेल्य ज्या अधिकाऱ्यांना जुनी सेवानिवृत्ती वेतन योजना आणि मृत्यु नि सेवानिवृत्ती उपदान योजनेच्या तरतुदी , शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या ज्ञापनाद्वारे लागू करण्यात आल्या आहेत , अशा प्रकरणी NPS प्रणालीच्या खात्यातील संचति निधीचा परताना मंजुर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
तसेच याबाबत संबंधित भारतीय प्रशासन सेवा अधिकाऱ्याने त्याचे संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांच्याकडे त्यांच्या NPS प्रणालीच्या खात्यातील रक्कमेचा परतावा मिळण्याबाबत मागणी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . तसेच आहरण संवितरण अधिकारी यांनी संबंधित भारतीय प्रशासन सेवा अधिकाऱ्यास जुनी सेवानिृत्ती वेतन योजना आणि मृत्यु नि सेवानिवृत्ती योजना लागु झाल्याबाबत स्वयंस्पष्ट आदेशाची प्रत भारतीय प्रशासन सेवा अधिकाऱ्यांच्या NPS प्रणालीच्या खात्यावरील अशंदान , नियोक्त्याचे अंशदान आणि त्यावरील लाभ यांच्या संपर्ण तपशिलासह भारतीय प्रशासन सेवा अधिकाऱ्यांचे NPS प्रणालीचे सभासदत्व संपुष्टात आणण्याचा प्रस्ताव संबंधित कोषागार अधिकाऱ्यांकडे सादर करुन त्यातील रक्कमांची मागणी करावी असे निर्देश देण्यात आलेले आहेत .
कोषागार अधिकारी यांनी प्राप्त रक्कमांचे दान भाग केले जातील , यातील प्रथम भाग म्हणजे भारतीय प्रशासन सेवा अधिकाऱ्याचे स्वत : चे अंशदान व त्यावरील लाभ आणि दुसरा भाग म्हणजे शासनाचे अंशदान व त्यावरील लाभ . तसेच राज्य अभिलेख अभिकरणाने संचित निधी मागविण्याचा प्रस्तावास मंजूरी देण्याचे निर्देश सदर शासन निर्णयान्वये देण्यात आलेले आहेत .
या संदर्भातील सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 05 फेब्रुवारी 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.