NPS धारक कर्मचारी आक्रमक ; जुनी पेन्शन करीता उद्यापासून आमरण उपोषण !

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ nps employee stike for old pension scheme ] : राज्यातील एनपीएस धारक कर्मचारी जुनी पेन्शन करीता आक्रमक झाले आहेत , जुनी पेन्शन ( Old Pension ) योजना पुर्ववत लागु व्हावी या प्रमुख मागणीकरीता गांधी जयंतीनिमित्त उद्या दि.02 ऑक्टोंबर 2024 पासुन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येणार आहेत .

जुनी पेन्शन करीता महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने आजपर्यंत महामंडण मोर्चा , आक्रोश मोर्चा , अर्धनग्न आंदोलन , जलसमाधी आंदोलन , पेन्शन संघर्ष यात्रा , पेन्शन संकल्प यात्रा , पेन्शन जनक्रांती महामार्चा तसेच राज्यस्तरीय लाक्षणिक उपोषण तसेच दि.15 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या शिर्डी येथे 18 लाख सरकारी कर्मचाऱ्यांचे महा-पेन्शन अधिवेशन झाले .

केंद्र सरकारने नुकतीच लागु केलेली युनिफाईड पेन्शन योजना , राज्य सरकारने स्विकारलेली पेन्शन योजना राज्य कर्मचाऱ्यांना मान्य नसल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत . तसेच वयाच्या 58 वर्षापर्यंत शासनाला सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी मिळावी या मागणीकरीता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून मा.श्री.वितेश खांडेकर यांच्यासह राज्य कर्मचारी सदर उपोषणांमध्ये सहभागी होणार आहेत .

देशांमध्ये 05 राज्य सरकारीने जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागु केली आहे , तर महाराष्ट्र राज्यासारख्या विकसित राज्यात जुनी पेन्शन लागु करणे अतिशय सोपी बाब असल्याचे नमुद करण्यात आले आहेत , जो राजकीय पक्ष लोकप्रतिनिधींना लागु असणारी जुनी पेन्शन योजनेचे समर्थ करेल अथवा लागु करेल त्यांनाच 18 लाख कर्मचारी व त्यांचे लाखो कुटुंबियांचा आशिर्वाद मिळेल अन्यथा कर्मचारी Vote for OPS हे अभियान राबवेल असे नमुद करण्यात आले आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment