Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , संगीता पवार : NPS कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची धक्कादायक वृत्त समोर येत आहेत , ते म्हणजे सरकार कर्मचाऱ्यांच्या दबावाखाली येऊन जुनी पेन्शन योजना लागू करणार नाही , असे स्पष्टीकरण देण्यात येत आहे . सन 2004 मध्ये वाजपेयी सरकारने केंद्रामध्ये राष्ट्रीय पेन्शन योजना लागू केली .

त्यानंतर देशातील पश्चिम बंगाल वगळता सर्व राज्यांनी राष्ट्रीय पेन्शन योजनेचा स्वीकार केला . परंतु सध्या कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना परत लागू करण्याची मागणी विचारात घेता , काही राज्य सरकार जुनी पेन्शन योजना परत लागू करीत आहेत . परंतु केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या दबाव खाली येणार नसून , कोणत्याही परिस्थितीत जुनी पेन्शन योजना लागू करणार नाही , तर राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्येच बदल करण्यात येईल असे स्पष्टीकरण देण्यात येत आहे .

देशामध्ये राजस्थान , पंजाब ,छत्तीसगड ,हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू आहे . सदर राज्याची आर्थिक परिस्थिती खालावली जात आहे , या राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे वाढीव निधीची मागणी केली जात आहे . यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना परत जुनी पेन्शन योजना लागू केल्यानेच हा आर्थिक संकट येत असल्याचे केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात येत आहे ..

हे पण वाचा : राज्य कर्मचाऱ्यांना “ना हरकत” प्रमाणपत्र सादर करणेबाबत, GR निर्गमित दि.02 ऑगस्ट 2023

सरकारी कर्मचाऱ्यांना परत जुनी पेन्शन योजना लागू होईल का ? असा प्रश्न राज्यसभेत विचारला असता , केंद्र सरकारकडून ठामपणे स्पष्टीकरण देण्यात आले की , सन 2004 नंतर सुरु झाल्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन नसल्याचे स्पष्ट केले आहे . यावेळी केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले की, सन 2021- 22 मध्ये पेन्शनवर 2.54 लाख कोटी खर्च झाला . तर 2022-23 मध्ये तीन लाख कोटी रुपये खर्च झाला . यामुळे केंद्र सरकार कोणत्याही परिस्थितीत जुनी पेन्शन कडे परत जाणार नाही ..

महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या अजित पवार हे वित्तमंत्री आहेत ,मागील वर्षी राज्य कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले असता, राज्य कर्मचाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत जुनी पेन्शन लागू करता येणार नाही असे वक्तव्य अधिवेशनात केले होते .सध्या वित्त मंत्री पद परत अजितदादा पवार यांच्याकडे आल्याने , राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होईल का ? असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडत आहे ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचारी व सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *