NPS धारक अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी मोठी महत्वपुर्ण माहिती ; 31 मार्च 2025 पर्यंत करावे लागेल हे काम !

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ NPS Employee imp update about new nps scheme / UPS Pension Scheme ] : राज्यातील एनपीएस धारक कर्मचाऱ्यांना पेन्शन विकल्प संदर्भात मोठी महत्वपुर्ण अपडेट समोर येत आहे . यानुसार राज्य शासन सेवेत दि.31.03.2024 पर्यंत विकल्प सादर करावे लागणार आहेत .

राज्य शासन सेवेत दि.01.11.2005 नंतर रुजु झालेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना ऐवजी सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना / केंद्र सरकारची एकीकृत राष्ट्रीय पेन्शन योजना लागु करण्यात आलेली आहे . याकरीता राज्य शासनांकडून निर्गमित शासन निर्णयानुसार , सदर कर्मचाऱ्यांना आपला विकल्प सादर करणे आवश्यक असणार आहे .

विकल्प सादर न केल्यास , राष्ट्रीय पेन्शन योजना लागु राहील : ज्या एनपीएस धारक अधिकारी / कर्मचाऱ्यांना एकीकृत राष्ट्रीय पेन्शन योजना अथवा सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना या पैकी एक पेन्शन योजना लागु करण्याचा विकल्प दि.31.2025 पर्यंत आपल्या कार्यालय प्रमुखाकडे सादर न केल्यास , अशांना राष्ट्रीय पेन्शन योजनाच लागु राहणार आहे .

सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना व केंद्र सरकारची एकीकृत राष्ट्रीय पेन्शन योजना ह्या राष्ट्रीय पेन्शन योजनांपेक्षा फायदेशिर आहेत . यामुळे सर्वांनी विकल्प नमुना सादर करण्याचे आव्हान महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना मार्फत करण्यात आले आहेत .

जुनी पेन्शनची लढाई सुरुच राहील : महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनांची लढाई जुनी पेन्शन बाबत अविरत सुरु राहणार आहे , परंतु जे पदरात पडले , ते पाडून घेवून पुढे मार्गक्रमण करण्याचा निर्धार केला जात आहे .  

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment