Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ NPS employee imp shasan nirnay dated 27 December] : एनपीएस धारक कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वित्त विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे . सदर शासन निर्णयानुसार , सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेतुन निवृत्त झालेल्या / होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञेय करण्याच्या अनुषंगाने स्पष्टीकरण देण्यात आले आहेत .
यांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , एनपीएस / परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन प्रणाली योजना अंतर्गत कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधीत मृत्यु झाल्यास , त्यांच्या कुटुंबियांना कुटुब निवृत्तीवेतन व मृत्यु उपदान व रुग्णता सेवानिवृतत झालेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णता निवृत्तीवेतन व सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त झालेल्या / होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञेय करण्या बाबतचा निर्णय घेण्यात आला आहे .
विविध शासकीय कार्यालयांकडून प्राप्त निवृत्तीवेतन प्रकरणांमध्ये काही मुद्द्याच्या अनुषंगाने स्पष्टीकरण करण्याची विनंती महालेखापाल कार्यालयांकडून करण्यात आली आहे . त्या अनुषंगाने प्रमुख बाबी सदर शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेल्या आहेत .
दि.01 एप्रिल 2023 पुर्वी मृत्यु झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांकडून दिनांक 31.03.2023 रोजी शासन निर्णयासोबत जोडलेल्या नमुना 03 मधील विकल्पाची प्रत तसेच दिनांक 01 एप्रिल 2023 रोजी अथवा त्या नंतर मृत्यु झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित कार्यालयाने वित्त विभाग , शासन निर्णय दि.31.03.2023 नुसार सादर करण्यात आलेल्या नमुना – 2 / नमुना 3 कुटुंब , निवृत्तीवेतन प्रस्तावासोबत महालेखापाल कार्यालयाकडे सादर करताना आहरण व संवितरण अधिकारी / सक्षम प्राधिकाऱ्याकडून प्रमाणित करुन सादर करणे आवश्यक राहणार आहेत .
तसेच दिनांक 31 मार्च 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार सानुग्रह अनुदान योजना बंद करण्यात आली आहे , त्यामुळे दिनांक 01 एप्रिल 2023 पुर्वी मृत्यु पावलेल्या कर्मचाऱ्यां बाबतीत सानुग्रह अनुदान देण्यात आले आहे , किंवा नाही याबाबतचे प्रमाणपत्र प्राप्त करुन घेवून प्रस्तावा सोबत महालेखापाल कार्यालयास पाठविणे आवश्यक आहे .
परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली मधील कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा असलेले कर्मचाऱ्यांचे अंशदान व त्यावरील लाभ संबंधितांना देण्यात येवून शासनाचे अशंदान व त्यावरील लाभ संबंधितांना मिळणाऱ्या निवृत्तीविषयक लाभामधून समायोजित करुन शासन खात्यात जमा करण्यात आले आहे असे प्रमाणपत्र सविस्तर लेखाशिर्षासह महालेखापाल कार्यालयांकडे सादर करणे आवश्यक असणार आहे . या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.