लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : राष्ट्रीय पेन्शन योजना धारक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी बातमी समोर येत आहे , ती म्हणजे राष्ट्रीय पेन्शन योजना नियमांमध्ये मोठा बदल करणेबाबत केंद्र सरकारकडून प्रस्ताव तयार करण्यात आलेले आहेत . आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर सरकारकडून कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनेची मोठी भेट दिली जाईल .
रॉयटर्सचे हे एक वैश्विक वृत्त असून 200 देशांमध्ये कार्यरत आहे , या वृत्तांमध्ये दिलेल्या माहितीनुसार भारत सरकार राष्ट्रीय पेन्शन नियमांमध्ये बदल करुन कर्मचाऱ्यांना शेवटच्या किमान मुळ वेतनाच्या 40 ते 45 टक्के एवढी रक्कम पेन्शन म्हणून दिली जाईल अशा पद्धतीने केंद्र सरकारकडून बदलाव करण्यात येणार आहेत . यांमध्ये काही प्रमाणात कर्मचाऱ्यांचे देखिल योगदान घेतले जाणार आहेत .
जुनी पेन्शन योजनांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या वेळी मिळणाऱ्या मुळ वेतनाच्या 50 टक्के रक्कम पेन्शन म्हणून देण्यात येते , यावर डी.ए देखिल देण्यात येत असतो . याप्रमाणे राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये किमान पेन्शन मिळावे याकरीता कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या 40 टक्के ते 45 टक्के एवढी किमान पेन्शन म्हणून देण्यात येणार आहे .सध्या राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान हे 10 टक्के तर सरकारचा वाटा 14 टक्के एवढा आहे . आता राष्ट्रीय पेन्शन मध्ये बदलाव करण्याच्या दृष्टीने कर्मचारी योगदानांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे .
आंध्र प्रदेश राज्य सरकारने लागु केलेली पेन्शन योजना यांमध्ये देखिल राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे पेन्शन लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्यांचे योगदान घेतले जाते . केंद्र सरकारकडून लवकरच याबाबत मोठा निर्णय घेणार आहे , केंद्र सरकारच्या निर्णयाची वाट महराष्ट्र राज्य सरकार करत असल्याने महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार ज्याप्रमाणे पेन्शन नियमात बदल करेल त्याप्रमाणे पेन्शन योजना लागु महाराष्ट्र राज्य सरकार लागु करु शकते .
राष्ट्रीय पेन्शन योजना प्रणालींमध्ये कर्मचाऱ्यांना खुपच कमी रक्कम पेन्शन म्हणून मिळत होती , शिवाय जमा रक्कमेवर हवा तसा परतावा मिळत नसल्याने आता , सरकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्येच 40 -45 टक्के पेन्शनची हमी दिली जाणार आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !