Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ NPS Employee Pension System Change ] : राष्ट्रीय पेन्शन योजना मध्ये समाविष्ट कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा प्राप्त झाला आहे , कारण केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पेन्शन योजना नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे . या सुधारणामुळे आता कर्मचाऱ्यांना अधिक पर्याय उपलब्ध होणार आहेत , बदल करण्यात आलेले नियम पुढीलप्रमाणे पाहुयात ..

आता राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये समाविष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्यांना NPS मध्ये जमा ठेवी काढण्यासाठी अधिक पर्याय मिळणार आहेत . निवृत्तीनंतर आता NPS धारक कर्मचारी जमा रक्कमेच्या 60 टक्के रक्कम एकरकमी पैसे SLW द्वारे मासिक , त्रेमासिक , सहामाही अथवा वार्षिक आधारावर पसंतीनुसार वयाच्या 75 वर्षांपर्यंत काढू शकणार आहेत .

PFRDA ने जारी केलेल्या परिपत्रकानुसार सदर माहिती देण्यात आली असून , विद्यमान पैसे काढण्याच्या मार्गदर्शक सुचनांनुसार कर्मचाऱ्यांच्या 60 वर्षांनंतर / निवृत्तीनंतर वार्षिक पद्धतीने सुविधांचा लाभ घेवू शकणार आहेत . वयाच्या 75 वर्षांपर्यंत सेवानिवृत्तीनंतर एकरकमी रक्कम काढण्याची प्रक्रिया आपल्या पसंतीच्या संयोजनात पुढे ढकलु शकणार आहेत , तसेच वयाच्या 75 व्या वर्षापर्यंत मासिक , सहामाही , वार्षिक पद्धतीने जमा रक्कमेच्या 60 टक्के रक्कम काढू शकणार आहेत .

म्हणजेच बदललेल्या नियमानुसार सेवानिवृत्तीनंतर NPS खात्यांमध्ये जमा करण्यात आलेल्या रक्कमेपैकी 60 टक्के रक्कम ही आपल्या आवडीनुसार वयाच्या 75 व्या वर्षांपर्यंत पैसे काढण्याची परवानगी असणार आहे .यासाठी PFRDA ने आपल्या अंतर्गत कार्यरत सर्व नोडल कार्यालयांना अवगत करुन SLW च्या सर्व सदरस्यांना पाँईटस ऑफ प्रेझेन्स , एन पी एस टी तसेच कार्पोरेट येथे माहिती देण्यात सुचित करण्यात आलेले आहेत .

या नियमांमुळे एन पी एस धारक कर्मचाऱ्यांना आपल्या एन पी एस खात्यांमध्ये जमा रक्कम वयांच्या 75 व्या वर्षांपर्यंत मासिक , सहामाही तसेच वार्षिंक पद्धतीने काढू शकणार आहेत , ज्यामुळे सदर योजनेचे सदस्य असणाऱ्यांना फायदा मिळणार आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *