Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ NPS Employee After Retirement benefit shasan Nirnay ] : नविन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत दिनांक 01 नोव्हेंबर 2005 रोजी व त्यानंतर सेवेत प्रथम नियुक्त झालेल्या अधिकारी / कर्मचारी यांच्या सेवानिवृत्ती उपदानाच्या प्रयोजनार्थ जोडून देणेबाबत , राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 30 मे 2024 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदरच्या निर्णयांमध्ये नमुद करण्यात आले आहे कि , वित्त विभागाच्या दिनांक 31 ऑक्टोंबर 2005 व दि.27 ऑगस्ट 2014 नुसार दिनांक 01.11.2005 रोजी अथवा त्यानंतर राज्य शासन सेवेत नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अनुक्रमे परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागु करण्यात आली आहे . त्याचबरोबर वित्त विभागाच्या दिनांक 31 मार्च 2023 नुसार परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन / राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यु झाल्यास …

त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यु उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा रुग्णता निवृत्तीवेतन व सेवानिवृत्ती उपदान त्याचबरोबर शासन सेवेतुन निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदानाचा लाभ अनुज्ञेय करण्यात आला आहे .परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना व NPS प्रणाली अंतर्गत दिनांक 01 नोव्हेंबर 2005 रोजी व त्यानंतर शासन सेवेत प्रथम नियुक्ती झालेल्या शासकीय कर्मचाऱ्याची त्याच किंवा अन्य विभागातील / कार्यालयांमध्ये नविन पदावर नियुक्त करण्यात आली असेल अशा प्रकरणी सेवानिवृत्ती उपदान / मृत्यु उपदान यासाठी अर्हताकारी सेवेची परिगणना करण्याकरीता शासकीय कर्मचाऱ्याची पुर्वीची सेवा नविन पदाच्या सेवेस जोडून देण्यासाठी अनुसरावयाच्या कार्यपद्धतीबाबत पुढीलप्रमाणे स्पष्टीकरण करण्यात येत आहेत .

यामध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , दिनांक 01 नोव्हेंबर 2005 रोजी अथवा त्यानंतर शासन सेवेत प्रथम नियुक्ती झालेल्या शासकीय कर्मचाऱ्याची त्याच अथवा अन्य विभागातील / कार्यालयांमध्ये नविन पदावर नियुक्ती करण्यात आल्यास अशा प्रकरणी सदर निर्णयांमध्ये नमुद अटीची पुर्तता झाल्यास , सेवानिवृत्ती उपदान / मृत्यु उपदान यासाठी अर्हताकारी सेवेची परिगणना करण्याकरीता शासकीय कर्मचाऱ्यास पुर्वीची सेवा सध्याच्या पदास जोडून देण्यास परवानगी देता येईल असे नमुद करण्यात आलेले आहेत .

यांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , शासकीय कर्मचाऱ्याची अगोदरची नियुक्ती नियमित स्वरुपाची वैध मार्गाने झालीली असावे असे , म्हणजे सदर कर्मचाऱ्यांची संबंधित पदाकरीता विहीत करण्यात आलेल्या सेवाप्रवेश नियमांच्या तरतुदींची पुर्तता करुन नियुक्ती झालेली असावी असे नमुद करण्यात आलेले आहेत .

तसेच सदर कर्मचाऱ्याने नविन पदाकरीता केलेला अर्ज संबंधित कार्यालयाच्या प्रशासकीय प्राधिकाऱ्याची योग्यरित्या पुर्वपरवानगी घेवून करण्यात आला असावा असे नमुद करण्यात आले आहे . तसेच एखादा कर्मचाऱ्याचे अगोदरच्या पदाचा परिविक्षाधिन कालावधी पुर्ण केलेला नसेल अशा प्रकरणी त्याचा नविन अथवा दुसऱ्या पदावर स्थायीकरण झाल्यावर पहिल्या पदाकरीता केलेल्या परिविक्षाधिन सेवा सेवानिवृत्ती उपदानाच्या प्रयोजनाकरीता अर्हताकारी सेवा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल असे नमुद करण्यात आले आहेत .

या संदर्भातील सविस्तर जीआर पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *