लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील NPS /DCPS कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेमध्ये लागु असणारी अर्जित रजा रोखीकरण लागु करणेबाबत , वित्त विभागांकडून ( Finance department ) अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक (Shasan Nirnay ) दि.14.06.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .
महाराष्ट्र राज्य शासन सेवेत नविन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेचे सभासद सेवानिवृत्त / राजीनामा / नोकरी सोडल्यास / निधन झाल्यास महाराष्ट्र नागरी सेवा ( रजा ) सुधारणा नियम 2016 मधील तरदीनुसार अर्जितर रजा रोखीकरण अनुज्ञेय करणेबाबत , राज्याचे संचालक राज्य अभिलेख देखभाल अभिकरण संचालनालय लेखा व कोषागारे यांच्या प्रति वित्त विभागांने परिपत्रक सादर करण्यात आले आहे .
या पत्रांमध्ये नमुद करण्यात आले आहे कि , दिनांक 01 नोव्हेंबर 2005 रोजी व त्यानंतर शासन सेवेत नियुक्त झालेल्या व विहीत मार्गाने सेवा समाप्त ( नियत वयोमान सेवानिवृत्ती / मृत्यू इ. ) झालेल्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या अर्जित रोखीकरणाबाबत शासन स्तरावर उचित आदेश होणेबाबत विनंती करण्यात आलेली आहे .
हे पण वाचा : राज्य कर्मचाऱ्यांच्या बदली बाबत सुधारित अटी लागू , GR निर्गमित !
याबाबत नमुद करण्यात येते कि वित्त विभागाच्या दि.31 ऑक्टोंबर 2005 शासन निर्णयातील परिच्छेद 5 ( ब ) येथे स्पष्टपणे नमुद केले आहे कि , 01 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर महाराष्ट्र राज्य शासन सेवेमध्ये नियुक्त होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना NPS / DCPS पेन्शन योजना लागु ठरणार आहे . मात्र सध्या अस्तित्वात असलेली निवृत्तीवेतन योजना म.नागरी सेवा ( निवृत्तीवेतन ) नियम 1982 व म.ना.सेवा ( निवृत्तीवेतन अंशराशीकरण ) नियम 1984 आणि सध्या अस्तित्वात असलेली सर्वसाधारक भविष्य निर्वाह निधी योजना त्यांना लागु होणार नाही .
दिनांक 01 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर शासकीय सेवेत नियुक्ती होणाऱ्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा ( रजा ) नियम 1981 लागु होणार नसल्याबाबत , कोणतेही आदेश निर्गमित करण्यात आलेले नाहीत , त्यामुळे सदर कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम 1981 हे जसेच्या तसे लागु असणार आहेत .या संदर्भात वित्त विभागांकडून दि.14 जून 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक , कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !