लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय पेन्शन योजनेचे समायोजन जुनी पेन्शन योजना ( OPS ) मध्ये करण्याची प्रक्रिया अखेर पुर्ण झालेली आहे . यामुळे आता कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन हाच एकमेव पर्याय उरला आहे , जुनी पेन्शन योजनाचा लाभ मिळविण्यासाठी आता विकल्प देता येणार नसुन राष्ट्रीय पेन्शन योजनेचे जुनी पेन्शन योजनांमध्ये मध्ये समायोजन करण्यात येत आहेत .
देशांमधील काही निवडक आखिल भारतीय सेवा ( AIS ) अधिकाऱ्यांचे राष्ट्रीय पेन्शन योजना खात्याचे रुपांतर जुनी पेन्शन योजना ( GPS ) मध्ये रुपांतरीत करण्याची सरकारची प्रक्रिया अखेर पुर्ण करण्यात आलेली आहे . यामुळे आता सदर आखिल भारतीय सेवा मधील अधिकाऱ्यांना पुर्वलक्षी प्रभावाने जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे .
हे अधिकारी / कर्मचारी असतील OPS साठी : राष्ट्रीय पेन्शन योजना अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली तारीख दि.22.12.2003 आणि दि.01.01.2004 रोजी किंवा नंतर सेवेत सामील झालेले परंतु ज्यांचे समायोजन राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये करण्यात आलेले आहेत , अशा अधिकाऱ्यांना NPS रद्द करुन जुनी पेन्शन योजना घेण्यास पात्र ठरविण्यात आलेले आहेत . यांमध्ये नागरी सेवा परीक्षा 2003 , भारतीय वन सेवा परीक्षा 2003 व नागरी सेवा परीक्षा 2004 परीक्षेद्वारे निवड झालेल्या अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजनांमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत .
वरील परीक्षेद्वारे निवड झालेल्या अधिकाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन पेन्शन योजना योजना वरुन जुनी पेन्शन योजनाचा पर्याय घेवू इच्छितात , अशा अधिकाऱ्यांनी दिनांक 30.11.2023 पर्यंत OPS चा पर्यायाचा स्विकार करायचा आहे . या बाबतीत संपुर्ण प्रक्रिया करण्याचे आदेश संबंधित राज्य शासनांस देण्यात आलेले आहेत .
अधिकाऱ्यांनी जुनी पेन्शन योजनेचा पर्याय निवडल्यास , सदर अधिकाऱ्यांच्या NPS मधील जमा रक्कम भविष्य निर्वाह निधी नियम 1955 नुसार कार्यवाही करण्यात येणार असून , एनपीएस मधील जमा रक्कम भविष्य निर्वाह निधी मध्ये जमा करण्यात येणार आहे .राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये राज्य सरकारने दिलेले योगदानाची रक्कम परत राज्य सरकारच्या खात्यांमध्ये वर्ग केले जातील .
या संदर्भात केंद्र शासनांकडून निर्गमित करण्यात आलेले कार्यालयीन ज्ञापन ( OS ) डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , तसेच इतर पात्र , सेवानिवृत्त पेन्शनधारक / निवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !
- SSC / HSC महाराष्ट्र राज्य फेब्रु/ मार्च बोर्ड परीक्षा 2024 वेळापत्रक प्रसिद्ध ; पाहा / डाऊनलोड करा PDF
- राज्यात दि.27 ते 30 नोव्हेंबर पर्यंत राज्यातील या 09 जिल्ह्यात पावसाची शक्यता ; तर दि 01 ते 04 डिसेंबर काळात अवकाळी पावसाची शक्यता !
- एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार निवडुन येणाऱ्या संभाव्य आमदारांची नावे ; या 10 अपक्ष आमदारांचा देखिल समावेश .
- शिक्षकांची वाढीव पदे समायोजन करणेबाबत , महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित !
- इ.10 वी / 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक जाहीर ; जाणून घ्या तोंडी व लेखी परीक्षा वेळापत्रक !