Spread the love

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ Now again one year B.ED course ] : आता पुन्हा एकदा बॅचलर ऑफ एज्युकेशन अभ्यासक्रम एक वर्षांचा होणार असल्याची , माहिती शिक्षण परिषदे कडून देण्यात आलेली आहे . सदर अभ्यासक्रम सन 2026-27 पासून बदलण्यात येणार आहेत .

सदरचा बदल हा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (New education policy) अंतर्गत बदलण्यात आले असून , शिक्षक पात्रता चाचणीच्या नियम आणि निकषांमध्ये देखील बदल करण्यात येणार आहेत . हे बदल सन 2027  मध्ये चार वर्षांच्या एकात्मिक पदवी उमेदवारांच्या बॅचच्या आधी करण्यात येणार आहेत .

यासाठी बीएड महाविद्यालयाकरिता नवीन बदलांची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे . यामध्ये चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण झाल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहेत . म्हणजेच चार वर्षांच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केल्याच्यानंतर विद्यार्थ्यांना एक वर्षात b.ed साठी प्रवेश घेता येणार आहे .

तर तीन वर्षांच्या पदवीधर विद्यार्थ्यांना दोन वर्षातील बीएड करिता प्रवेश मिळेल . याशिवाय चार वर्षांचे एकात्मिक बीएड आणि दोन वर्षांचे बी.एड शिकणारी M.Ed पदवीकरिता प्रवेश घेऊ शकणार आहेत .

सदरचा महत्वपूर्ण बदल नवीन शैक्षणिक धोरण अंतर्गत करण्यात आले असून सदर अभ्यासक्रम सन 2026-27 या वर्षापासून लागू केले जाणार आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *