Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी  [ State Employee November Month Payment Update ] : कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर 2023 चे शालार्थ वेतन देयके सादर करतांना करावयाची कार्यवाही बाबत मा.उप सचिव शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मंत्रालय मुंबई यांचे परिपत्रक दि.14.09.2023 रोजीच्या परिपत्रकानुसार खालील प्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

सदर परिपत्रकानुसाार माहे सप्टेंबर चे वेतन सीएमपी प्रणाली द्वारे करण्यात आलेले असून माहे नाव्हेंबर 2023 चे वेतन सीएमपी प्रणाली द्वारे थेट कोषागार कार्यालयातुन कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .यासाठी कार्यालय प्रमुखांनी आपल्या अधिनस्थ कर्मचाऱ्यांचे वेतन खाते व अशासकीय कपातीची खाते यांचे क्रमांक तसेच आयएफसी कोड योग्य असल्याबाबत , खात्री करुन देयके शालार्थ प्रणालीमध्ये तयार करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

माहे ऑक्टोंबर 2023 चे वेतनासोबत ज्या कार्यरत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा सातावा वेतन आयोग फरकाचा 2 रा हप्ता केवळ भविष्य निर्वाह निधी प्रलंबित असेल त्यांचा शालार्थ प्रणालीमधून अदा करण्यात आला असून मुळ वेतन फरक व GPF अरिअर्स टॅब बंद करण्यात येईल .तसेच ज्या कर्मचाऱ्यांना प्रान नंबर मिळालेले आहेत त्यांची माहे नोव्हेंबर 2023 चे वेतनामधून नियमित एनपीएस कपात करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

 तसेच जे एनपीएस कर्मचारी या महिन्यात सेवानिवृत्त होत असतील त्यांचे एनपीएस वर्गणी व शासन हिस्सा कपात करण्यात येवू नयेत असे निर्देश देण्यात आलेले आहेत . तसेच ज्या शिक्षकांचे GPF कपात आहे ते सेवानिवृत्त होत असल्यास 3 महिने आधी GPF कपात बंद करण्यात यावेत . तसेच ज्या कर्मचाऱ्यांना वित्त विभाग कडून GPF क्रमांक मिळालेला नाही त्यांचे GPF कपात करण्यात येवू नयेत असे निर्देश देण्यात आलेले आहेत .

आयकर कपात टीडीएस कपात हीह नियमाप्रमाणे करण्यात यावीत सन 2022-23 मध्ये कर्मचाऱ्यास पडलेला एकुण आयकर टीडीएस वजा जाता /  10 याला 100 च्या पटीत अशा प्रकारे कपात करण्यात यावेत . देयके फॉरवर्ड केल्यानंतर एकाही शिक्षकांनी वेतन अदा होईपर्यंत आपले शाखा बदल करुन नयेत याबाबत अधिनस्त सर्व कर्मचाऱ्यांना कळविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

तसेच शालार्थ प्रणातीमध्ये झालेल्या नविन बदलानुसार यानंतर BASIC , 7 PCDA , HRA , TA , NPS ALLOW या व्यतिरिक्त सर्व टॅब बंद करण्यात आलेले आहेत .यानंतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन ब्रोकन पिरीईड मधून विना पुर्व परवानगीने टाकरण्यात येवू नयेत असे निर्देश देण्यात आलेले आहेत

माहे नोव्हेंबर 2023 चे वेतन देयके सादर करणेबाबत उप सचिव शालेय शिक्षण विभागांकडून दिनांक 09 नोव्हेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी लिंकवर क्लिक करावेत ..

शासन परिपत्रक

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *