Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Payement Stop ] : राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांचे वेतन हे प्रशासनांकडून रोखण्यात आलेले आहेत . याचे कारण देत प्रशासनांकडून काम करा आणि पगार मिळवा अशा प्रकारचे नोटीस जारी केले आहेत .
राज्यातील शिक्षण क्षेत्रांमध्ये कार्यरत शिक्षकांना शिकविण्या व्यतिरिक्त अनेक काम असतात , सदर काम विहीत कालावधीमध्ये , न केल्याने प्रशासनांकडून कठोर कार्यवाही करण्यात येत आहेत . यांमध्ये यु-डायस प्लस , सरल प्रणालीचे इत्यादी माहिती ही शैक्षणिक योजनांच्या अंदाजपत्रांकरीता भरण्यात येते . मात्र राज्यातील अनेक शाळांकडून सदरची माहिती देताना टाळाटाळ केली जात असल्याने , महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या प्रकल्प संचालकांनी अशा प्रकारचे आदेश शिक्षण अधिकारी यांना बजावले आहेत .
यु-डायस प्लस पोर्टलवरील सन 2023-24 सत्राची माहिती भरण्यासाठी दिनांक 31 ऑक्टोंबर 2023 पर्यंत मुदत देण्यात आलेली होती , तरी देखिल राज्यातील तब्बल 38 हजारांपेक्षा अधिक शाळांनी सदर यु-डायस प्लस पोर्टलवर माहिती भरली नाही , याकडे दुर्लक्ष केले आहे . या कारणांमुळेच सदर माहिती अद्यावत न केलेल्या राज्यातील 38 हजार शाळांमधील शिक्षक कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर महिन्यांचे वेतन अदा करण्यात येवू नये अशा प्रकारचे आदेश शिक्षण परिषदेने देण्यात आलेले आहेत .
यांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , दिनांक 30 नोव्हेंबर पर्यंत सदरचे काम पुर्ण न केल्यास , माहे नोव्हेंबरचे वेतन थांबविण्याचे आदेश वेतन पथकांना देण्यात आलेले आहेत . शैक्षणिक योजनांच्या अंदाज पत्रकांसाठी शाळांच्या यु-डायस वरील माहिती विचारात घेवून भौतिक सोयी -सुविधा उपलब्ध करुन देण्यात येते . परंतु राज्यातील तब्बल 38,735 शाळांनी सदरची माहिती अद्यावत केली नाही .
यामुळे सदरची माहिती भरल्यानंतर मुख्याध्यापकांकडून प्रमाणित केल्यानंतर नोव्हेंबर महिन्यांचे वेतन अदा करण्यात यावेत असे शिक्षण परिषदेने आदेश दिले आहेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.