Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Non-teaching employees do not get the benefit of a single pay scale ] : एकस्तर वेतश्रेणी ही अतिदुर्गम / आदिवासी / नक्षली भागांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना दिले जाते . एकस्तर वेतनश्रेणी ही पदोन्नतीच्या पदांच्या वेतनश्रेणी दिली जाते .
म्हणजेच एकस्तर वेतनश्रेणीत कनिष्ठ लिपिक असेल तर वरिष्ठ लिपिकांची वेतनश्रेणी , प्राथमिक शिक्षक असेल तर माध्यमिक शिक्षकाची वेतनश्रेणी दिली जाते . तर अधिक्षकांना वॉर्डनची वेतनश्रेणी दिली जाते . परंतु ही मर्यादा केवळ काही पदांकरीताचा मर्यादित ठेवण्यात आली आहे .
जसे कि , आदिवासी विकास विभागांमध्ये माध्यमिक शिक्षकांना , माध्यमिक मुख्याध्यापक पदांवर पदोन्नती दिली जाते , परंतु त्यांना एकस्तर वेतनश्रेणीमध्ये , माध्यमिक मुख्याध्यापकाची वेतनश्रेणी दिली जात नाही .
तसेच वर्ग – 4 कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचे पद हे लिपिक , सहाय्यक हे पद आहेत , परंतु त्यांना एकस्तर वेतनश्रेणी सदर पदांचे वेतन दिले जात नाहीत . यामुळे काही पदांवर अन्याय होत असल्याच्या तक्रारी असून , या नियमांमध्ये बदल करण्याची कर्मचाऱ्यांकडून मागणी होत आहे .
तर एकाकी पदांना एकस्तर वेतनश्रेणीत केवळ सातवा वेतन आयोगात पुढचा टप्पा दिला जातो , यामुळे एकाकी पदांना एकस्तर वेतनश्रेणी योग्य असे लाभ मिळत नसल्याचे निदर्शनास येत आहेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.