कर्मचाऱ्यांची सेवा संपली तरी सेवेत मुदत वाढ देणेबाबत , सा.प्र.विभागाचा अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय !

Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ niyukti after employee retirement ] : राज्य शासन सेवेतील अधिकारी / कर्मचाऱ्यांची सेवा संपुष्टात आल्यानंतर देखिल सदर अधिकारी / कर्मचाऱ्यांची सेवा निवृत्तीनंतर पुढे सुरु ठेवणेबाबत / करार पद्धतीने कामावर घेणेबाबत सामान्य प्रशासन विभाग मार्फत दि.08.01.2016 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदरच्या निर्णयांमध्ये नमुद केल्याप्रमाणे , केवळ आवश्यक सेवांसाठी सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांचे आस्थापना विषयक बाबी / सेवाप्रवेश नियम , पायाभुत सुविधा निर्मिती , तसेच नागरी सेवा पुरविणे , विशेष गुप्त वार्ता , योजनांचे मुल्यमापन इ. बाबी विचारात घेवून , निवृत्तीनंतर करार पद्धतीने नियुक्ती देण्याचे नमुद करण्यात आले आहेत .

सदरची नियुक्त ही प्रथम : 03 वर्षांच्या कालावधीकरीता करण्याचे नमुद आहेत , तर त्याचा वर्षनिहाय आढावा घेण्याचे निर्देश आहेत . सदरची नियुक्त ही नियमित स्वरुपाची न करता केवळ विवक्षित कामासाठी करण्याची तरतुद आहे .

परंतु सदरच्या नियुक्तीमुळे सरकारी सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीवर कोणताही प्रतिकुल परिणाम होता कामा नयेत , सदरची नियुक्ती ही एका वेळी एक वर्षाकरीता दिली जावी , त्यानंतर तीन वर्षापर्यंत सदर नियुक्ती देता येईल .

सदर करार पद्धतीने नेमणुक करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांस त्याच्या निवृत्ती पुर्वी मिळत असलेल्या एकुण वेतनातुन त्यांना आता मिळत असलेले एकुण निवृत्तीवेतन वजा केल्याच्या नंतर होणारी रक्कम त्यांचे मासिक परिश्रमिक म्हणून निश्चित करण्यात यावेत असे नमुद आहेत . सदर पारिश्रमिक मासिक कमाल मर्यादा ही 40,000/- रुपये इतकी असणार आहे .

शासन निर्णय (GR)

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment