Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Flipkart & Tata Pay Launch ] : भारतांमध्ये ग्राहकांची सर्वात जास्त संख्या असल्याने , कोणतीही वस्तु भारतांमध्ये चांगल्या आकर्षक पद्धतीने लाँच केल्यास , त्या कंपनीचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो , याच्या विरुद्ध ज्या कंपनीची नकारात्मक बातमी व्हायरल झाल्यास त्याचे बाजारमुल्य सर्वाधिक खाली पडते , असेच भारतीय मार्केट मध्ये पेटीएमच्या बाबतीत झाले , आरबीआय ने पेटीएम ॲप्स वर काही निर्बंध लावले तेंव्हा पेटीएम ॲप्सचे शेअर चक्क 500 टक्क्यांनी घसरले आहेत .

यामुळे आता पेटीएमचे वापरकर्ते फोन पे , गुगल पे व इतर युपीआयचा वापर करीत आहेत , यातच आता नविन दोन युपीआय ॲप्स बाजारांमध्ये लाँच झाले आहेत , यांमध्ये भारतीय स्वदेशी टाटा पे व फ्लिपकार्ड पे हे बाजारांमध्ये लाँच करण्यात आलेले आहेत . सध्य स्थितीमध्ये टाटा पे हे सर्वांसाठी खुले नसुन काही टेस्टिंग बाकी असल्याने , लवकरच सर्वांसाठी खुले केले जाणार आहेत .

टाटा पे हे ॲप्स देखिल सर्वांसाठी लवकरच लाँच केले जाणार आहे , याची प्रतिक्षा वापर कर्त्यांकडून केले जात आहेत , कारण टाटा ही कंपनी स्वदेशी असून , सर्वात लोकप्रिय कंपनी आहे . ज्यामुळे आपले ट्रान्झेक्शन सुरक्षित होतील , अशी वापर कर्त्यांची धारणा आहे .

तर फ्लिपकार्ड पे ह्या युपीआय ॲप्सची ची सेवा सुरुवात करण्यात आलेली आहे . ही सुविधा अमेझॉन पे सारखी असणार आहे , ज्यांमध्ये आपणांस रेफरल कुपन तसेच शॉपिंग कुपन देखिल मिळणार आहेत . ज्यांमध्ये आपणांस शॉपिंग , पैसे पाठविणे या करीता वापर करता येणार आहेत . तसेच यांमध्ये हेल्थ प्लस तसेच क्लिअरट्रिप या सेवांचा समावेश करण्यात आलेला आहे .

सध्य स्थितीमध्ये ही सुविधा फक्त अँड्रॉईड वापर कर्त्यांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे . टप्याने ही सुविधा आयओएस व वेब वापरकर्त्यांकरीता उपलब्ध करुन देण्यात येणार आहे . ही सुविधा आपणांस शॉपींग ॲप्स मध्ये अमेझॉन पे मध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेली होती . आता  तशा प्रकारची सुविधा आता फ्लिपकार्ड मध्ये उपब्ध करुन देण्यात आलेले आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *