Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ New Tata Nano EV ] : टाटा नॅनो ईव्ही आता नविन अंदाजामध्ये लाँच करण्यात येणार आहे , जी कि सर्वसामान्यांना सहज परवडणारी कार असणार आहे . तर इलेक्ट्रिक फिचर्समुळे ही कार तब्बल 300 कि.मी अंतर एका चार्ज मध्ये पार करेल .
रिपोर्टनुसार टाटा कंपनीकडुन टाटा नॅनो कार ही दोन नविन व्हेरियंटमध्ये आणली जाणार आहे , त्यापैकी एक CNG + पेट्रोल असणार आहे तर दुसऱ्या व्हेरियंटमध्ये पुर्णपणे इलेक्ट्रिक कार असणार आहे . जुन्या नॅनोपेक्षा या नविन व्हेरियंटमध्ये स्पेस देखिल मोठा घेण्यात येणार असल्याने अधिक कंफर्ट असणार आहे .
सदर कारची लांबी ही 3164 मीमी तर रुदी ही 1750 मीमी असेल तर ग्राउंड क्लिअरन्स 180 मीमी असेल तर व्हील बेस 2230 मीमी असेल .
तर इलेक्ट्रिक व्हेरियंट मध्ये 17 kwh बॅटरी पॅकसह एका सिंगल चार्जमध्ये 300 कि.मी पर्यंत चालु शकते . या कारची टॉप स्पीड 80 कि.मी प्रति तास असणार आहे .तसेच सुरक्षितेच्या बाबतीत टाटा कंपनीच्या कार अधिक सुरक्षित आहेत , यांमध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सेवा , ड्युअल फ्रंट एअरबॅग या सारख्या सेवा यांमध्ये देण्यात आलेल्या आहेत .
अंदाजित किंमत किती असेल ? : यांमध्ये सदर नविन नॅनोची किंमत ही 3.50 ते 5 लाख रुपये पर्यंत असेल .म्हणजेच ही कार सर्वसामान्यांना सहज परवडणारी ठरेल . कारण इलेक्ट्रिक कारमध्ये सर्वात स्वस्त कार नॅनो कार असणार आहे .
सध्या बाजारांमध्ये इलेक्ट्रिक कारच्या किंमती ह्या 9.50 लाख रुपयांपासुन सुरुवात होते . त्या तुलनेत टाटा नॅनो ईव्ही स्वस्त ठरणार आहे . व भारतांमध्ये टाटाची कंपनी सर्वच कार अधिक सुरक्षित असल्याने खप देखिल चांगला होण्याची शक्यता आहे .