सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ मंजुर करणेबाबत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित GR दि.28 डिसेंबर 2023

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Ashasit Pragati Yojana Shasan Nirnay ] : सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ मंजूर करण्याबाबत , राज्य शासनांच्या कौशल्य , रोजगार , उद्योजकता व नाविन्यता विभागांकडून दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

वित्त विभागाच्या दिनांक 02 मार्च 2019 रोजीच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना पहिला / दुसरा व तिसरा लाभ मंजूर करण्याची तरतुद करण्यात आलेली आहे . त्यानुसार आयुक्त , कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता यंत्रणेतील दिनांक 01 जानेवारी 2021 च्या ज्येष्ठता सुचीनुसार सहायक आयुक्त गट अ वेतनश्रेणी एस – 18  : 49100-155800/- या पदावर सलग 10 वर्षे सेवा पुर्ण झालेल्या शासन निर्णयामध्ये नमुद करण्यात आलेल्य अधिकाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगांनुसार वित्त विभगाच्या दिनांक 02.03.2019 रोजीच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ मंजुर करण्यात येत आहेत .

आश्वासित प्रगती योजनांचा पहिला लाभ नंतरची वेतनश्रेणी ही एस – 23 : 67700-208700/- अशी असणार आहे . या संदर्भात आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता यांनी सदर शासन निर्णयातील आदेशाची अंमलबजावणी करुन त्याबाबतचा अनुपालन अहवाल राज्य शासनांस सादर करण्यााचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

या संदर्भात कौशल्य , रोजगार , उद्योजकता व नाविन्यता विभागांकडून दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment