नवीन वर्षामध्ये शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी नवा नियम ; नियमाचे पालन करणे बंधनकारक , जाणून घ्या सविस्तर ..

Spread the love

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ new rules for state employee ] : नवीन वर्षापासून शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना नवीन नियम लागू करण्यात आला आहे . सदर नियमाचे पालन करणे अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी बंधनकारक असणार आहेत . नेमके कोणते नियम आहेत , कोणत्या कर्मचाऱ्यांसाठी लागू आहे . या संदर्भातील सविस्तर माहिती खालील प्रमाणे पाहूयात ..

नाशिक जिल्हाधिकारी यांनी नवीन नियम शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी नवीन वर्षात लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . यामध्ये दर सोमवारी शासकीय अधिकारी / कर्मचारी यांनी एका विशिष्ट रंगाच्या पेहरावात दिसणार आहेत . याशिवाय वाहतूक करण्यासाठी महिन्यातून एकदा पहिल्या सोमवारी खाजगी वाहनांचा वापर करण्याऐवजी सार्वजनिक वाहनाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत .

याशिवाय अधिकारी / कर्मचारी यांच्यासाठी ओळखपत्र स्पष्ट दिसेल अशा पद्धतीने वापरणे बंधनकारक करण्यात आले आहेत . तर नागरिकांनी ओळखपत्र विषयक विचारणा केली असता , ते त्यांना स्पष्टपणे सांगण्याचे निर्देश देण्यात आलेली आहेत . ओळखपत्रांमध्ये संबंधित अधिकारी / कर्मचाऱ्याचे नाव , पदनाम यांचा तपशील नमूद असेल , ज्यामुळे नागरिकांना अधिकारी /  कर्मचाऱ्यांची ओळख होण्यास मदत होईल .

नवीन वर्षापासून आठवड्याच्या पहिल्या सोमवारी सर्व अधिकारी / कर्मचारी यांना फिकट रंगाचा सदरा आणि काळा रंगाची पॅन्ट तर महिला अधिकारी /  कर्मचाऱ्याकरिता फिकट पिवळ्या रंगाची साडी व निळ्या रंगाचे ब्लाऊज अथवा पिवळ्या रंगाचे सलवार कमीज परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहे .

सदरची नियमावली नाशिक जिल्ह्यातील कार्यालयातील सर्व अधिकारी / कर्मचाऱ्यांकरिता हा नियम नवीन वर्षापासून लागू होणार आहे . सदर नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असल्याचे , जिल्हाधिकारी यांच्याकडून सुचित करण्यात आले आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment