Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ new pension rules ] : ज्येष्ठ नागरिक कर्मचारी पेन्शन संदर्भात केंद्र सरकारकडून नवीन मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आले आहेत . यानुसार काही महत्त्वपूर्ण बदल यामध्ये करण्यात आलेले असुन ते पुढील प्रमाणे जाणून घेऊयात .
सदर नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये 80 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या पेन्शन धारकांना आता अतिरिक्त पेन्शनचा लाभ मिळणार आहे . केंद्र सरकारच्या कार्मिक व निवृत्तीवेतन मंत्रालयाकडून निर्गमित करण्यात आलेल्या , अधिसूचनानुसार सदर 80 वर्ष व त्यापेक्षा अधिक वयाच्या पेन्शनधारकांना अनुकंपा भत्त्याच्या नावावर अतिरिक्त पेन्शनचा लाभ दिला जाणार आहे .
केंद्र सरकारने पेन्शन नियम 2021 च्या नियम 44 मधील उपनियम 06 मधील तरतुदीनुसार सदर पेन्शनधारकांना अनुकंप भत्ता दिला जातो , यामध्ये सुधारणा करून अतिरिक्त अनुकंपा भत्त्याच्या रक्कमेत वाढ करण्यात आलेली आहे . ज्यामुळे 80 वर्षे व त्यापेक्षा अधिक वयाच्या पेन्शनधारकांना सदर अतिरिक्त अनुकंप भत्ता मिळणार आहे . अनुकंप भत्त्याची टक्केवारी वयानुसार , पुढील प्रमाणे जाणून घेवू शकता .
80 ते 85 वर्ष असणाऱ्या पेन्शनधारकांना मूळ पेन्शनच्या 20% तर 85 ते 90 वर्ष असणाऱ्या पेन्शन धारकांना मूळ पेन्शनच्या 30 टक्के रक्कम , त्याचबरोबर 90 ते 95 वर्ष असणाऱ्या पेन्शन धारकांना मूळ पेन्शनच्या 40 टक्के तर 95 ते 100 वर्ष पेन्शनधारकांना मूळ पेन्शनच्या 50% रक्कम तर 100 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या पेन्शन धारकांना त्यांच्या मूळ पेन्शनच्या 100 टक्के पेन्शन म्हणजेच दुप्पट पेन्शन देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे .
सदर अनुकंप भत्ता मुळेच ज्येष्ठ पेन्शनधारकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे , त्यांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार असल्याने , त्यांच्या वयानुसार आरोग्यासाठी होणारे खर्च भागले जाणार आहेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.