Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ New Pension Pranali Various Question And Answer ] :राज्य सरकारने दिनांक 01 नोव्हेंबर 2005 नंतर शासन सेवेत रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शनचा नवा पर्याय खुला केला आहे , या नव्या पेन्शन पर्यायामुळे कर्मचाऱ्यांना नेमके कोणते लाभ प्राप्त होतील , नेमका कोणता बदल झाला , याबाबत कर्मचाऱ्यांच्या मनांमध्ये अनेक प्रश्न उद्भवत आहेत , या प्रश्नांचे उत्तर पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
01.जुनी पेन्शन योजनांमध्ये पेन्शन प्राप्त करण्यासाठी व सुधारित राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमधील मुख्य फरक कोणता आहे ? – जुनी पेन्शन प्रणाली प्राप्त करण्यासाठी कर्मचाऱ्यांस आपल्या वेतनातुन कोणत्याही प्रकारची कपात करता येत नाही , परंतु राज्य सरकारने लागु केलेली नविन सुधारित पेन्शन प्रणालीमध्ये कर्मचारी योगदान ( 10 टक्के ) कायम ठेवण्यात आलेले आहेत .
02.सुधारित पेन्शन प्रणालीनुसार पेन्शन प्राप्तीकरीता किमान वर्षांची अट किती आहे ? – जुन्या पेन्शन प्रणालीमध्ये शेवटच्या वेतनाच्या 50 टक्के रक्कम प्राप्त करण्यासाठी किमान 10 वर्षे सेवा पुर्ण होणे अपेक्षित आहे , परंतु या नविन पेन्शन प्रणालीमध्ये शेवटच्या वेतनाच्या 50 टक्के रक्कम पेन्शन घेण्यासाठी किमान 30 वर्षे सेवा पुर्ण होणे आवश्यक आहे .
03.स्वेच्छा सेवानिवृत्ती बाबत कोणती तरतुद आहे – जुन्या पेन्शन योजनांमध्ये स्वेच्छा सेवानिवृत्ती प्रकरणी जर कर्मचाऱ्यांची सेवा ही 20 वर्षे पुर्ण झाली असल्यास त्यास शेवटच्या 3 वर्षाच्या सरासरी वेतनाच्या 50 टक्के एवढी पेन्शन देण्यात येते , तर सदर सुधारित नविन पेन्शन प्रणालींमध्ये याबाबत कोणतीही तरतुद नाही .
04.महागाई भत्ता वाढ कसा मिळणार ? जुन्या पेन्शन योजनांमध्ये विद्यमान सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सदर 06 महिन्याला डी.ए चे सुधारित दर लागु होते , परंतु सदर सुधारित पेन्शन प्रणालीमध्ये कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती प्रसंगाच्या तत्कालीन डी.ए चे दर लागु होणार आहेत .
05.पेन्शन वृद्धी : जुन्या पेन्शन योजनांमध्ये पेन्शन धारकांच्या विशिष्ट वयानंतर पेन्शन मध्ये वृद्धी होत असते , परंतु सदर सुधारित पेन्शन प्रणालीमध्ये याबाबत कोणत्याही प्रकारची तरतुद करण्यात आलेली नाही .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.