Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Government Employee New Pay Scale & Vadhiv Mahagai Bhatta News New Good Update ] : सरकारी कर्मचाऱ्यांना आगामी नविन वर्षांमध्ये नविन वेतन आयोग व महागाई भत्ता मधील कमालीच वाढ मिळणार मिळणार आहे . या संदर्भातील आत्ताची घडीची नविन अपडेट पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
महागाई भत्ता मध्ये कमालीची वाढ : सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2024 मध्ये डी.ए मध्ये कमालीची वाढ लागु होणार आहे , नुकतेच माहे केंद्रीय कामगार मंत्रालयांकडून माहे ऑक्टोंबर पर्यंत प्रसिद्ध झालेल्या ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारावर सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2024 मध्ये देय डी.ए चे दर हे 49.08 होते , तर पुढील दोन महिन्यांची आकडेवारीचा अंदाजित आकडेवरीनुसार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये 50.80 टक्के पर्यंत वाढ होत आहे .
म्हणजेच एकुण महागाई भत्ता मध्ये 5 टक्क्यांची वाढ होणार आहे , ही वाढ आत्तापर्यंतची कमालीच वाढ असणार आहे . या वर्षी माहे एप्रिल / मे महिन्यांमध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार असल्याने , आचारसंहिताच्या अगोदरच म्हणजेच पुढील महिन्यांमध्ये , डी.ए वाढीबाबतचा अधिकृत कार्यालयीन ज्ञापन केंद्र सरकारच्या वित्त विभागांकडून निर्गमित करण्यात येईल .यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा एकुण डी.ए 46 टक्के वरुन 51 टक्के होईल ..
नविन वेतन आयोगाची स्थापना ( New Pay Commission ) : वेतन आयोग हे दर 10 वर्षानंतर लागु करण्यात येत असते , सातवा वेतन आयोग 2016 पासुन लागु करण्यात आला तर वेतन आयोग समितीची स्थापना दोन वर्षापुर्वीच म्हणजेच सन 2014 पर्वुीच करण्यात आली होती , तसेच मागील वेतन आयोग लागु करण्यापुर्वी दोन वर्षांच्या अगोदरच वेतन आयोग समितीची स्थापना करण्यात आलेली होती . यामुळे या वर्षी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुढील नविन वर्षांमध्ये नविन वेतन आयोगाची स्थापना करण्याची मोठी शक्यता वर्तविली जात आहे . .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.