Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ new pay commission sanyukt sallagar meeting ] : देशातील सरकारी कर्मचारी तसेच पेन्शन धारकांसाठी आत्ताची मोठी आनंदाची अपडेट समोर येत आहे . ती म्हणजे कर्मचाऱ्यांना दहा वर्षांनी लागू करण्यात येणारा , नवीन वेतन आयोग म्हणजेच आठवा वेतन आयोग स्थापन करण्याची वेळ जवळ आलेली आहे .
प्राप्त माहितीनुसार केंद्र सरकार सन 2025 च्या अर्थसंकल्पामध्ये आठवा वेतन आयोगाची स्थापना करणार आहे , ज्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे . नवीन वेतन आयोगामध्ये किमान वेतनामध्ये लक्षणीय वाढ दिसून येणार आहे . म्हणजेच केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात 18,000/- रुपये ते 35,000/- रुपये पर्यंत वाढ होणार आहे .
सदर आठवा वेतन आयोगावर (8th Pay commission) सविस्तर चर्चा करण्याकरिता ‘या’ महिन्यातील शेवटच्या आठवड्यात संयुक्त सल्लागार मंडळाची बैठक होण्याचे दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे . सदर बैठकीमध्ये अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या सेवा शर्तीचा विचार करून विविध मागण्यावर तोडगा काढण्यात येणार आहे .
पेन्शन मध्ये देखील होणार वाढ : आठवा वेतन आयोगानुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीबरोबरच पेन्शन धारकाच्या पेन्शनमध्ये किमान 9,000/- ते 17,000/- रुपये पर्यंत वाढ होऊ शकते . जी की फिटमॅट फॅक्टरच्या आधारावर वाढ होणार आहे .
फिटमेंट फॅक्टर वाढीबरोबरच इतर देय वेतन , भत्ते यामध्ये देखील मोठी वाढ अपेक्षित आहे , एकंदरीत सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये नवीन वेतन आयोगात 15 ते 20 टक्क्यांची वाढ होईल .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.