लाईव्ह मराठी पेपर , प्रणित पवार : सरकारी कर्मचाऱ्यांना आत्ताची मोठी खुशखबर समोर येत आहे , ती म्हणजे नवा / आठवा वेतन आयोग लागु करणेबाबत , केंद्र सरकारकडून हिरवा कंदील देण्यात आलेला आहे . केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना नवा वेतन आयोग लागु करणेसंदर्भात वेतन आयोगाची स्थापना करण्यात येणार आहे .
केंद्रीय वित्त राज्य मंत्री पंकज चौधरी यांना संसदेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासांमध्ये कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागु करण्यात येणार कि नाही असा प्रश्न उपस्थित केला असता , वित्त राज्य मंत्री यांनी उत्तर देताना सांगितले कि कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागु न करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही . यामुळे कर्मचाऱ्यांना आठवा / नवा वेतन आयोग लागु करण्यासाठी वेतन आयोगाची स्थापना करण्यात येईल , जेणेकरुन कर्मचाऱ्यांना विहीत वेळेत नवा वेतनाचा लाभ अनुज्ञेय करण्यात येईल .
दर दहा वर्षांनी कर्मचाऱ्यांच्या वेतनांमध्ये सुधारणा करण्यात येत असते , केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 01 जानेवारी 2016 मध्ये सातवा वेतन आयोग ( सुधारित वेतन संरचना ) लागु करण्यात आली आहे . या संदर्भात तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकिर्दीत सातवा वेतन आयोगाची सेवानिवृत्त न्यायमुर्ती अशोक कुमार माथुर यांच्या अध्यक्षतेखाली सन 2014 मध्ये स्थापना करण्यात आली होती .
याच धर्तीवर दर पुढील वेतन आयोग हा सन 2026 मध्ये लागु करण्यात येईल , याकरीता आठवा वेतन आयोग समितीची स्थापना सन 2024 मध्ये करणे आवश्यक आहे , याकरीता केंद्र सरकारकडून हालचाली सुरु करण्यात आलेल्या आहेत . पुढील वर्षी केंद्र सरकारकडून नवा वेतन आयोगाची ( आठवा वेतन आयोग ) समितीची स्थापना करण्यात येईल .
केंद्र सरकारच्या समितीचा अहवालानंतर राज्य कर्मचाऱ्यांना नवा वेतन आयोग लागु करण्यासाठी राज्य नवा वेतन आयोग समितीची स्थापना करण्यात येईल .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !