Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ new pay commission prastav in central budget ] : देशातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नविन वेतन आयोग लागु करणेबाबत प्रस्ताव तयार करण्यात आल्याचे मोठी बातमी मिडीया रिपोर्टनुसार समोर येत आहे . सदर नविन वेतन आयोग बाबत अर्थसंकल्पांमध्ये मोठी घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे .
फिटमेंट फॅक्टर 3.68 पट वाढ : फिटमेंट फॅक्टर हा मुळ वेतनाशी आधारित आहे , ज्या प्रमाणात फिटमेंट फॅक्टर मध्ये वाढ लागु करण्यात येईल , त्या प्रमाणात मुळ वेतनांमध्ये वाढ होईल . आठवा वेतन आयोगांमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना 3.68 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे पगार वाढ लागु केल्यास , किमान मुळ वेतन हे 18,000/- वरुन 26,000/- रुपये इतके होईल . तर महाराष्ट्र राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना 3.68 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे पगारवाढ लागु केल्यास , किमान मुळ वेतन हे 15,000/- वरुन 21,000/- रुपये अशी वाढ लागु होईल .
महागाई भत्याचे दर शुन्य तर इतर भत्यांमध्ये होईल मोठी वाढ : नविन वेतन आयोग लागु केल्यास , महागाई भत्याचे दर हे पुन्हा शुन्य टक्के होईल ,तर इतर देय भत्यांचे दर हे वाढतील , यांमध्ये घरभाडे भत्ता , वाहन भत्ता , प्रोत्साहन भत्ता इ. मध्ये वाढ होईल .
नविन वेतन आयोग समिती स्थापनेचा प्रस्ताव : मिडीया रिपोर्टनुसार मिळालेल्या माहितीनुसार , केंद्र शासनांचे अर्थसंकल्प 23 जुलै 2024 रोजी सादर करण्यात येणार आहेत , यांमध्ये नविन वेतन आयोग समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत .कारण दर 10 वर्षांनी सरकारी कर्मचाऱ्यांना नविन वेतन आयोग लागु करण्यात येत असतो , सन 2016 मध्ये सातवा वेतन आयोग नंतर आता सन 2026 मध्ये नविन वेतन आयोग लागु करण्यात येणार आहेत , याकरीता नविन वेतन आयोग समितीची स्थापना करण्यात येणार आहेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.