आठवा वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचे वेतन 38 टक्के तर पेन्शन मध्ये 34 टक्क्यांची होईल वाढ !

Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ new pay commission payment and pension increase ] : नविन आठवा वेतन आयोगानुसार सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन हे 38 टक्केने तर पेन्शन धारकांच्या पेन्शनमध्ये 34 टक्क्यांची वाढ होईल . यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार व पेन्शनधारकांच्या पेन्शन मध्ये मोठी वाढ होईल .

मुळ वेतनातील वाढ ही फिटमेंट फॅक्टर वाढीच्या प्रमाणात वाढ होणार आहे , सध्य स्थितीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार 2.57 पट फिटमेंट फॅक्टरनुसार वेतनश्रेणी निश्चित करण्यात आलेल्या आहेत .

सदर फिटमेंट फॅक्टर प्रमाणे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान मुळ वेतन हे 18,000/- रुपये तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान मुळ वेतन हे 15,000/- रुपये आहे . आता आठवा वेतन आयोग मध्ये 2.68 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे वेतनात वाढ करण्यात येणार असल्याची चर्चा होत आहे .

2.68 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे वेतनातील वाढ विचारात घेतली असता , किमान मुळ वेतनात 6,000/- रुपयांची जी कि , वेतनश्रेणीनुसार 46,000/- रुपये पर्यंत वाढ होवू शकते . तर याचा फायदा सेवानिवृत्ती उपदानात तब्बल 2.5 पट वाढ होईल . तर पेन्शन मध्ये नविन वेतन आयोगानुसार तब्बल 34 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे पेन्शन धारकांना मोठा आर्थिक फायदा होईल .

नविन वेतन आयोग कधी पासुन लागु होईल ? : नविन वेतन आयोग हा दिनांक 01 जानेवारी 2026 पासुन लागु होणार आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment