Live Marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee New Pay Commission & Old Pension Scheme Update ] : सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग व जुनी पेन्शन योजना बाबत आत्ताची मोठी आनंदाची अपडेट समोर येत आहे , या संदर्भातील सविस्तर अपडेट पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर होणार कर्मचाऱ्यांच्या मागण्या पुर्ण : मार्च / एप्रिल 2024 मध्ये देशांमध्ये सार्वत्रिक लोकसभा तसेच महाराष्ट्र राज्यांसह इतर 05 राज्यांमध्ये विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर करण्यात आलेल्या आहेत . यामुळे आता देशातील कर्मचारी वर्गांना खुश करण्यासाठी सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यावर तोडगा काढण्यात येत आहेत .
जुनी पेन्शन योजना : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे पेन्शन लाभ देण्यासाठी लाभ अदा करण्यासाठी अभ्यास समिती गठित करण्यात आलेली होती . सदर समितीने अहवाल केंद्र सरकारला सादर करण्यात आलेला असून , यामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्येच सुधारणा करण्यात येणार असल्याची माहीती समोर येत आहे . ज्यांमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना निश्चित पेन्शनचा लाभ अनुज्ञेय होणार आहे .
तर महाराष्ट्र राज्य सरकारकडून राज्यातील कर्मचाऱ्यांना सेवेच्या कालावधीनुसार 35 टक्के , 40 टक्के , 50 टक्के पेन्शन लाभ देण्याचा विचार करीत आहे . ह्या पेन्शन योजनांमध्ये कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शनची हमी मिळणार आहे , जी कि आंध्र प्रदेश राज्य सरकारच्या धर्तीवर असणार आहे , परंतु यांमध्ये डी.ए चा अंतर्भाव असणार नाही .पुढील महिन्यात केंद्रीय कर्मचारी तसेच राज्यातील कर्मचारी हे पुन्हा एकदा महामोर्चा काढणार आहेत . यामुळे सरकारी कडून निवडणुकांच्या अगोदरच पेन्शनवर सकारात्मक निर्णय घेण्यात येणार आहेत .
नविन वेतन आयोग ( New Pay Commisson ) : केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सन 2026 मध्ये नविन आठवा वेतन आयोग सुधारित वेतन आयोगानुसार नियोजित असल्याने , सन 2024 मध्ये आठवा वेतन आयोग / नविन वेतन आयोगाची स्थापना सरकारला करावी लागणार आहेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.