Spread the love

लाईव्ह मराठी पेपार , प्रणिता पवार : आठवा वेतन आयोगाची (8th Pay Commission ) प्रतीक्षा करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी खुशखबर समोर आली आहे . केंद्र सरकारच्या मोदी सरकारकडून आठवा वेतन आयोग (New Pay Commission ) संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे . नुकतेच केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये मोठी वाढ लागू करण्यात आली आहे , ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या एकूण पगारांमध्ये मोठी वाढ झालेली आहे .

यानंतर केंद्र सरकारकडून पुन्हा एकदा माहे जुलै 2023 मध्ये डीए मध्ये मोठी वाढ केली जाणार आहे , मेडिया रिपोर्टच्या एका अहवालानुसार , केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोगाची स्थापना लवकरच केली जाणार आहे . ज्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतनमधे चक्क 44 टक्के वाढ होणार आहे .त्यामध्ये सरकारी कर्मचारी नवा आठवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी सरकारकडे करीत आहेत .

मीडियामध्ये आठवा वेतन आयोग संदर्भात मोठी चर्चा केली जात आहे , नव्या वेतन आयोगानुसार मिळणारे वेतन इतर भत्ते या संदर्भात नवीन आकडेवारी समोर येत आहेत . लोकसभेमध्ये झालेल्या चर्चेमध्ये केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांनी दिलेल्या माहितीनुसार , नवीन वेतन आयोगाची स्थापना पुढील वर्षी म्हणजेच 2024 मध्ये स्थापन करण्यात येणार आहे , ज्यामुळे नवीन वेतन आयोग 2026 पासून लागू केला जाऊ शकतो .

हे पण वाचा : Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांचे जुनी पेन्शन साठी चलो दिल्ली अभियान !

दर 10 वर्षांनी वेतन आयोगामध्ये सुधारणा करण्यात येत असते , सन 2016 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन आयोगामध्ये सुधारणा करून 2.57 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे सातवा आयोग लागू करण्यात आले . ज्यामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन हे अठरा हजार रुपये निश्चित करण्यात आले , तर आता नवीन आठव्या वेतन आयोगानुसार 3.68% फिटमेंट फॅक्टर प्रमाणे वेतन आयोगाची सुधारणा करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे .

3.68% फिटनेस ट्रॅक्टर प्रमाणे विचार केला असता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा किमान मूळ वेतन 18 हजार रुपये वरून वाढून 26 हजार रुपये इतका होईल , ज्यामुळे कर्मचाऱ्यांचे इतर वेतन व भत्ते यामध्ये मोठी वाढ होईल .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी त्याचबरोबर सेवानिवृत्त पेन्शन धारक कुटुंब निवृत्तीवेतनधारक असाल तर व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *