Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ New Pay Commission ] : सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2024 पासून 50 टक्के दराने डी.ए वाढ लागु करण्यात आलेली आहे , यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारे इतर भत्त्यांमध्ये देखिल वाढ अपेक्षित आहे . परंतु 50 टक्के डी.ए वाढ झाल्याने परंतु डी.ए चे दर शुन्य टक्के करणेबाबत नविन अपडेट समोर येत आहे .
डी.ए चे दर पुन्हा शुन्यापासून गणना करण्यात येईल : सध्या कर्मचाऱ्यांना कमाल 50 टक्के डी.ए दर लागु करण्यात आलेले आहेत , यामुळे आता पुन्हा डी.ए चे दर शुन्य टक्के करुन डी.ए वाढीची रक्कम ही मुळ वेतनात गणना केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे .कारण महागाई भत्तामधील कमाल वाढीमुळे मुळ वेतनात सुधारणा अपेक्षित आहे , यामुळे सरकारकडून ही पद्धत अंमलात आणू शकते .
हे पण वाचा ; सरकारी / खाजगी नोकरीची सुवर्णसंधी , लगेच करा आवेदन !
ज्यांमध्ये डी.ए मधील वाढ ही मुळे वेतनात ॲड केली जाईल , ज्यामुळे कर्मचाऱ्यांना मिळणारे डी.ए चे दर पुन्हा शुन्य टक्के होईल तर मुळ वेतनात वाढ होईल , ज्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनात देखिल वाढ होईल , व डी.ए दर पुन्हा शुन्य टक्क्यांपासून लागु होऊ शेकते . कारण केंद्र सरकारने नविन वेतन आयोग बाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याने , सरकारचे अशा प्रकाचे नविन पद्धतीने वेतन गणना करण्याची पद्धत अंमलात येवू शकते असे तज्ञांचे मत आहे .
कर्मचाऱ्यांना सन 2026 मध्ये नविन वेतन आयोग अपेक्षित आहे , नविन वेतन आयोगांमध्ये कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार 3.68 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे किमान मुळ वेतनात वाढ होणार आहे , ज्यांमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा विचार केला असता , किमान मुळे वेतनांमध्ये 8 हजार रुपये ( किमान मुळ वेतन 26000/-) तर राज्य कर्मचाऱ्यांच्या किमान मुळ वेतनांमध्ये 6 हजार ( किमान मुळे वेतन 21000/- ) इतकी वाढ हाईल .